स्तनपान (breast feeding) : बाळाचे पोट भरले आहे कसे ओळखावे?

file photo
file photo
Published on
Updated on

पूर्वा नेर्लेकर; पुढारी ऑनलाईन : स्तनपान (breast feeding) : 'मातृत्व' ही स्त्रीसाठी मिळालेली एक देणगी आहे. या अनुषंगाने येणारी प्रत्येकच गोष्ट ही स्त्री साठी अत्यंत महत्वपूर्ण असते. स्तनपान (breast feeding) करताना अनेक महिलांना बऱ्याच अडथळ्यांना सामोरे जावे लागते. बाळ जन्माला आल्यावर लगेच त्याला मध किंवा साखर पाणी न देता नवजात शिशूला आईला येणारा चिक द्यावा यातूनच त्याची पहिली भूक आणि त्याची प्रतिकारशक्ति दोन्ही गोष्टी साध्य करता येतील,  असे डॉक्टर ज्योत्स्ना देशमुख यांनी 'पुढारी ऑनलाईन'शी बोलताना सांगितले.

डॉक्टर ज्योत्स्ना देशमुख म्‍हणाल्‍या की,  पहिल्या प्रसुतीच्या वेळी बऱ्याचदा काही गोष्टी नवीन असतात तर काही गोष्टी माहीत नसतात. लाजून, घाबरून नेमके विचारावे कसे हा सुद्धा एक प्रश्न समोर असतो;  पण बाळाला स्तनपान करणे त्याच्या प्रतिकारशक्तीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्‍वाचे आहे.

स्तनपान (breast feeding) ही गोष्ट बाळ जन्माला आल्यावर करण्याची नसून आईने त्यासाठी संपूर्ण मानसिक तयारी ही प्रसुतीपूर्व करणे आवश्यक आहे. यासाठी असणारा  सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे स्तनाग्र.अत्यंत दुर्लक्षित असा हा अवयव असल्याने स्तनपान करताना महिलांना बरेचदा अडथळे येऊ शकतात. म्हणून आधीचे ९ महिने स्तनपान करण्याची मानसिक तयारी करून स्तनाग्रे रोज आंघोळ करताना दोन बोटांच्या चिमटीत पकडून हळूच बाहेर खेचणे आवश्यक आहे. यातून चपटी,आत खेचलेली स्तनाग्रे हा अडथळा येणार नाही.

आईला पहिल्यांदा दूध येत नसल्यास 'ही जबाबदारी स्त्रीरोग तज्ज्ञांची आहे. बाळ जन्माला आल्यावर ताबडतोब अगदी बाळाची नाळ सुद्धा न कापता त्याला आईच्या पोटावर ठेवावे. त्याचा स्पर्श हा आईच्या अनावृत्त स्तनास होणे आवश्यक आहे. यामुळे आईला दूध स्त्रवत असते. पटकन खूप दूध येईल असे नाही आधी चिक येतो पण या संपूर्ण प्रकारात संयम अत्यंत महत्वाचा आहे.'असेही डॉ. देशमुख म्हणाल्या.

बाळाला किती वेळ दूध द्यावे?

जन्माला आलेल्या बाळाची भूक ही जास्तीत जास्त १० एमएल इतकी असू शकेल. म्हणूनच त्यांना दर दीड ते दोन तासानी दूध देणे आवश्यक आहे. दूध देताना फोनवर बोलणे किंवा गप्पा मारणे, असे प्रकार न करता संपूर्ण लक्ष बाळावर द्यावे.

बाळाला ढेकर काढण्यासाठी त्याचे पोट आपल्या खांद्यावर येईल अश्या अवस्थेत बाळाला धरावे. बाळाची भूक किती? त्याला किती पाजावे ? या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला आईला थोडा वेळ लागू शकतो तरी साधारण बाळाचे वजन त्याची शक्ती याचा विचार करून त्याला पाजावे. अमुक इतकेच दूध प्यावे असा अट्टाहास धरू नये.

साधारण एकदा दूध देताना २० ते २५ मिनिटे दूध द्यावे. यात बाळ जर झोपले तर त्यास गालावर टिचकी मारावी ते पुन्हा दूध प्यायला सुरू करेल.

'मला स्तनपान करायचे आहे' ही मानसिक तयारी असेल आणि संयम असेल तर यात अडथळे कमी येतात.कोरोना असलेल्या मातेनेसुद्धा योग्य ती काळजी घेऊन स्तनपान करावे.

कारण स्तनपान हा आई आणि बाळ या दोघांचाही आधिकार आहे, असेही डॉक्टर ज्योत्स्ना देशमुख यांनी नमूद केले.

हेही वाचलंत का ?

हे पाहा :

येत्या काळात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध – शीतलकुमार रवंदळे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news