

किशोरवयीन मुलांमध्ये हार्मोन्समुळे आणि प्युबर्टीमुळे त्वचेच्या समस्या वाढू शकतात. अशावेळी, त्वचेचे आरोग्य टिकवण्यासाठी केवळ क्रीम, सिरम किंवा सप्लिमेंट्सवर अवलंबून राहण्याऐवजी आहाराकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते, योग्य आहारामुळे त्वचेचा कोमलपणा, कोलेजन निर्मिती आणि बाह्य प्रदूषणापासून संरक्षण मिळते.
१. हिरव्या पालेभाज्या
पालक, केळ, अरुगुला यांसारख्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन C आणि E भरपूर प्रमाणात असतात.
या अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचेचे संरक्षण होते आणि त्वचा तजेलदार राहते.
पालेभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्वचा हायड्रेट राहते.
२. फॅटी फिश (मासे)
मासे आणि फ्लॅक्ससीड्समध्ये आढळणारे ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स त्वचेच्या दाहशामक (anti-inflammatory) गुणधर्मांसाठी ओळखले जातात.
हे त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत.
३. फळे
ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी यांसारख्या बेरीजमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अँथोसायनिन्स मुबलक असतात.
या फळांमध्ये व्हिटॅमिन A, C आणि E देखील असतात, जे त्वचेला तजेलदार आणि निरोगी ठेवतात.
कीवी आणि संत्र्यासारखी फळे कोलेजन निर्मितीस मदत करतात.
४. सुका मेवा आणि बिया
बदाम, अक्रोड, मनुका यांसारख्या सुक्या मेव्यांमध्ये आवश्यक फॅटी अॅसिड्स आणि सूक्ष्म पोषकद्रव्ये असतात.
हे त्वचेला ओलावा आणि लवचिकता देतात.
५. दही
दही, केफिर, किम्ची यांसारख्या आंबवलेल्या पदार्थांमध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक्स असतात.
हे प्रोबायोटिक्स पचनसंस्थेचे आरोग्य सुधारतात आणि त्वचेतील दाह कमी करतात.
नियमितपणे दही खाल्ल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि चमकदार दिसते.
पाणी प्या: पुरेसे पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहते.
मद्यपान टाळा: मद्यपानामुळे त्वचा कोरडी पडते आणि दाह वाढतो.
(हा लेख सार्वजनिक माहिती आणि तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. कोणतीही नवीन आहार पद्धती अवलंबन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)