

पावसाळा आला की वातावरणात गारवा तर असतोच, पण त्याचबरोबर दमटपणाही वाढतो. या हवामानामुळे आपल्या त्वचेवर वेगवेगळ्या तक्रारी सुरू होतात जसं की चेहऱ्यावर सतत येणारे पिंपल्स, त्वचेची चिकटपणा, ब्लॅकहेड्स आणि वाईटहेड्स यांसारख्या अडचणी. विशेषतः ज्यांची त्वचा आधीपासूनच तेलकट (ऑयली) आहे, त्यांना पावसाळ्यात अजूनच त्रास होतो. त्यामुळे अशा हवामानात त्वचेची खास काळजी घेणं खूप गरजेचं असतं.
या ऋतूमध्ये दमट हवेमुळे चेहरा लवकरच घाण होतो आणि त्वचेचे छिद्र बंद होतात. परिणामी त्या ठिकाणी तेल साचून पिंपल्स वाढू शकतात. त्यामुळे चेहरा नेहमी ताजा ठेवण्यासाठी आणि या सगळ्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी काही सोप्या सवयी अंगीकारणं आवश्यक आहे.
पावसाळ्यात चेहरा दिवसभर घाम, धूळ आणि प्रदूषणाने खराब होतो. परंतु वारंवार फेसवॉश वापरल्यास त्वचा कोरडी होऊ शकते. त्यामुळे फेश वाइप्स जवळ ठेवा जे तुमच्या त्वचेला ओलावा (हायड्रेशन) देखील देतील. हे वाइप्स वापरून चेहरा स्वच्छ केल्यास धूळ, घाण दूर होते आणि छिद्रं बंद होण्याची शक्यता कमी होते.
रात्री झोपण्यापूर्वी मेकअप न काढता झोपणं त्वचेसाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे डबल क्लीन्सिंग करा म्हणजे आधी मेकअप रिमूव्हरने चेहरा साफ करा आणि नंतर सौम्य फेसवॉशने धुवा. त्यानंतर टोनर व मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. ही सवय ठेवली तर त्वचा सकाळी उठल्यावरही फ्रेश वाटेल.
बऱ्याच लोकांना वाटतं की पावसाळ्यात ऊन नसतं, त्यामुळे सनस्क्रीन लागणारच नाही. पण हे चुकीचं आहे. यावेळीही हानिकारक यूव्ही किरणं तुमच्या त्वचेला इजा पोहचवू शकतात. त्यामुळे एसपीएफ ३० किंवा ५० असलेलं जेल बेस्ड किंवा वॉटरप्रूफ सनस्क्रीन वापरा. शक्य असेल तर सनस्क्रीन स्प्रे जवळ ठेवा.
डायरेक्ट फेसवॉश न वापरता फक्त खोबरेल पाण्याने (normal temperature) चेहरा धुणं फायदेशीर असतं. हळूहळू पाण्याचे शिंतोडे मारल्यास त्वचेतील रक्ताभिसरण चांगलं होतं आणि चेहरा फ्रेश दिसतो. आठवड्यातून २-३ वेळा फेस आयसिंग (बर्फाने चेहरा हलकाच दाबणं) केल्यास पोर्स टाईट होतात. पण कोणी हेल्थ प्रॉब्लेम्स असतील तर हे टाळावं.
पावसात जड मेकअप केल्यास त्वचेचे छिद्र बंद होतात आणि त्यामुळे तेलकटपणा व एक्ने वाढतो. त्यामुळे शक्य तितकं मिनिमल मेकअप करा – म्हणजे फक्त लिप बाम, हलकासा फाउंडेशन आणि मस्कारा पुरेसं आहे. आणि मेकअप काढल्याशिवाय झोपायचं नाही हे लक्षात ठेवा.
पावसाळा म्हणजे केवळ गरम भजी आणि चहा एवढाच नाही, तर आपल्या त्वचेचीही काळजी घ्यावी लागते. यासाठी वर दिलेले उपाय रोजच्या सवयींमध्ये आणा. त्वचेवर थोडं लक्ष दिलं, तर तुम्ही संपूर्ण सीझनभर फ्रेश आणि ग्लोइंग दिसू शकता!