Sperm Preservation Case | ब्रेन-डेड पतीचे शुक्राणू जतन करण्यास पत्नीला परवानगी : हायकोर्टाचा मोठा निर्णय

Sperm Preservation Case | व्हेंटिलेटरवर पती असणार्‍या पत्‍नीने दाखल केलेल्‍या याचिकेवर
Sperm Preservation Case
प्रतीकात्मक छायाचित्र.File Photo.
Published on
Updated on

Sperm Preservation Case

कोची : केरल उच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश देत, 'ब्रेन-डेड' घोषित करण्यात आलेल्या व्यक्तीचे शुक्राणू (gametes) काढून ते जतन करण्याचे निर्देश रुग्णालयाला दिले आहेत. भविष्यात असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (ART) द्वारे गर्भधारणेसाठी पत्‍नीने दाखल केलेल्‍या याचिकेवर न्यायमूर्ती एम.बी. स्नेहलता यांनी हा आदेश दिला. पत्‍नीचा पती सध्या व्हेंटिलेटरवर असून त्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.

पतीचे शुक्राणू जतन करण्‍यासाठी पत्‍नीची हायकोर्टात धाव

'बार अँड बेंच'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, याचिकाकर्त्या महिलेने न्यायालयात सांगितले की, तिच्या पतीला कांजण्या (Chickenpox) झाल्या होत्या. त्यानंतर दोन आठवड्यांतच त्याला 'सेरेब्रल वेनस थ्रॉम्बोसिस' (मेंदूतील रक्तवाहिनीमध्ये गाठ होणे) हा आजार झाला, ज्यामुळे अखेर तो 'ब्रेन-डेड' झाला. सध्या तो केवळ व्हेंटिलेटरच्या आधारावर जिवंत आहे. अशा परिस्थितीत, आपल्या पतीच्या निधनानंतरही त्याचे अपत्य प्राप्त करण्यासाठी त्याचे शुक्राणू जतन करण्याची इच्छा पत्नीने व्यक्त केली होती.

Sperm Preservation Case
HC On Divorce Case Evidence | घटस्फोट प्रकरणी WhatsApp चॅट्स आणि कॉल रेकॉर्डिंग वापरास परवानगी : हायकोर्टाचा मोठा निर्णय

उच्‍च न्यायालयाचे हॉस्पिटल'ला निर्देश

कोझिकोड येथील 'बेबी मेमोरियल हॉस्पिटल'ला केरळ न्यायालयाने असे निर्देश दिले आहेत की, मान्यताप्राप्त ART क्लिनिकच्या मदतीने पतीचे शुक्राणू काढून ते 'क्रायोप्रिझर्व्हेशन' (अतिशीत तापमानात जतन) करून ठेवावेत.

Sperm Preservation Case
Marital Cruelty |"महिला सहन करतात म्हणून तक्रारीस उशीर होतो" : वैवाहिक छळ प्रकरणी हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

गर्भधारणा, न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय करता येणार नाही

तथापि, न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की, सध्या केवळ शुक्राणू जतन करण्याचीच परवानगी देण्यात आली असून 'असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (रेग्युलेशन) ॲक्ट, २०२१' अंतर्गत पुढील कोणतीही प्रक्रिया, जसे की गर्भधारणा, न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय करता येणार नाही.

Sperm Preservation Case
Sexual Harassment case| "'चाँद निकला' म्हणणे...": विनयभंग प्रकरणी हायकोर्टाने नोंदवले महत्त्वपूर्ण निरीक्षण

कायद्यातील अडचण आणि दिलासा

ART कायद्याच्या कलम २२ नुसार, ज्या व्यक्तीचे शुक्राणू वापरले जाणार आहेत, त्याची लेखी संमती असणे सक्‍ती असते. मात्र, पती ब्रेन-डेड असल्याने त्याची संमती मिळवणे अशक्य असल्याचे पत्नीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या प्रक्रियेला विलंब झाल्यास ही संधी कायमची गमावली जाऊ शकते, हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने तिला हा दिलासा दिला आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी ७ एप्रिल रोजी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news