

rising cancer rates young adults : कॅन्सर (कर्करोग) हा केवळ वृद्धांना होणार आजार अशी एकेकाळी धारणा होती. मात्र मागील काही वर्षांमध्ये तरुणांमध्ये कॅन्सरचे प्रमाणात झालेली वाढ ही चिंताजनक बाब ठरली आहे. आता विशी आणि तिशीतील तरुणांना कॅन्सरचे निदान होत आहे. कॅन्सर होण्यास अनुवंशिकता आणि पर्यावरणीय घटकांचा वाटा मोठा असला तरी तज्ज्ञांच्या मते अन्य कारणेही यासाठी कारणीभूत आहेत. जाणून घेवूया या कारणांविषयी...
तज्ज्ञांच्या मते “अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नांवर आपले अवलंबित्व आणि वाढती बैठी जीवनशैली हे तरुणाईला कॅन्सर होण्यामागील प्रमुख घटक आहेत. आजच्या तरुणाई सर्वाधिक पॅकेज्ड स्नॅक्स, साखरयुक्त फूड,फास्ट फूडचे सेवन करते. जीभेला चव पुरविणार्या पदार्थांमधील चरबी, शुद्ध साखर, मीठ आणि रासायनिक पदार्थ शरीरासाठी हानीकारक ठरतात. आजवरच्या अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, अशा प्रकारचा आहार विशेषतः स्वादुपिंड आणि पोटाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढवतो. यातील बऱ्याच गोष्टी आहार आणि चयापचय (वजन कमी करणं, पचन यासारख्या प्रक्रियांचा तपास) आरोग्याशी संबंधित आहेत.
चाळीस वर्षांपेक्षा कमी वयातील लोकांमध्ये थायरॉईड, स्तन, मूत्रपिंड आणि एंडोमेट्रियल कॅन्सर होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. डॉक्टरांच्या मते, अनेक तरुण थकवा, पचनाची समस्या आणि अस्पष्ट वजन वाढणे, दुर्लक्ष करतात. त्याऐवजी ताण किंवा जीवनशैलीला दोष देतात, ज्यामुळे कर्करोगाचा निदान उशिरा होतो.
प्रक्रिया केलेले अन्नपदार्थांमुळे वजन वाढते. लठ्ठपणा हा किमान 13 प्रकारच्या कॅन्सरसाठी एक मोठा जोखीम घटक आहे. जास्त शरीरात चरबी जमा होणे हार्मोन्स, विशेषतः इस्ट्रोजेन आणि इन्सुलिन, यांचे संतुलन बिघडवते. तसेच कॅन्सरच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करते. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थांतील खराब घटकांमुळे शरीर ट्यूमरच्या वाढीला मदत होते. तसेच प्रक्रिया केलेले अन्न आतड्यांतील फायदेशीर जीवाणू कमी करतात. शरीराच्या रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. आधुनिक जीवनशैलीतील सोयीस्कर आहार केवळ शरीराला आवश्यक पोषक तत्वे देत नाही, तर कर्करोगाच्या वाढीस मदत करतो. भारतात अशा प्रकारच्या आहाराच्या धोका अधिक आहे कारण लोकांच्या शरीरात जास्त अंतर्गत चरबी जमा होण्याची शक्यता असते, असेही यापूर्वीच्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे.
तज्ज्ञांच्या मते, तरुणाईला कॅन्सरच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठीठोस आहार धोरणांची आवश्यकता आहे. आदर्श आहार धोरणाची अंमलबजावणी आवश्यक आहे. तसेच खाद्य उत्पादनांवरील माहिती, मुलांसाठी शाळांमध्ये आहाराच्या नियमांची अंमलबजावणी आणि कामाच्या ठिकाणी किंवा शाळांमध्ये निरोगी अन्नाचे वातावरण असणेही आवश्यक आहे. तसेच आधुनिक जीवनशैलीतील बैठक काम ही आरोग्याच्या अनेक समस्यांना निमंत्रण देतो. तरुणाई कामानिमित्त अनेक तास एका ठिकाणी बसून राहते. आता कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी तरुणाईने आहाराबरोबर नियमित व्यायामाकडेही तितकेच गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.