Cancer Risk: घरातील 'या' ९ गोष्टींमुळं होऊ शकतो कॅन्सर!

Anirudha Sankpal

नॉन-स्टिक भांडी

नॉन-स्टिक भांड्यातून गरम झाल्यावर बाहेर पडणाऱ्या विषारी कणांमुळे फुफ्फुस आणि मूत्रपिंडाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

प्लास्टिक बॉटल

प्लास्टिकच्या बाटल्यांमधील BPA आणि फॅथलेट्स ही रसायने अन्नात मिसळून स्तनाच्या आणि प्रोस्टेट कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात.

ॲल्युमिनियम फॉइल

ॲल्युमिनियम फॉइलमध्ये ॲसिडिक अन्न गुंडाळल्यास ॲल्युमिनियमचे कण शरीरात जमा होऊन कर्करोगाचा धोका वाढवतात.

क्लिनिंग लिक्विड

साफसफाईच्या अनेक रसायनांमध्ये असलेले फॉर्मल्डिहाइड आणि बेंझिन हे घटक कर्करोगाचा धोका वाढवतात.

प्रोसेस फूड अन् साखर

उच्च प्रक्रिया केलेले पदार्थ आणि शुद्ध साखर खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिन आणि लठ्ठपणा वाढतो, ज्यामुळे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस चालना मिळते.

प्लास्टिक चॉपिंग बोर्ड

प्लास्टिक चॉपिंग बोर्डवर कोणतीही भाजी किंवा पदार्थ कट करताना त्या बॉर्डमधील प्लास्टिकचे बारीक कण हे अन्नात मिसळतात. ते सातत्यानं पोटात गेले तर त्यापासून कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो.

टी बॅग

काही चहाच्या पिशव्या गरम पाण्यात विरघळणाऱ्या एपिक्लोरोहायड्रिन या कर्करोगास कारणीभूत ठरू शकणाऱ्या रसायनाने बनलेल्या असू शकतात.

सुगंधी मेणबत्त्या

स्वस्त आणि सुगंधित मेणबत्त्या जळाल्यावर हवेत विषारी रसायने सोडतात, ज्यामुळे दीर्घकाळ श्वसनात अडथळा येऊन धोका निर्माण होतो.

कॅन फूड

कॅनमधील प्रिझरव्हेटिव्ह वापरलेले अन्नपदार्थ हे आरोग्यासाठी हानीकारक असतात. त्यामुळं देखील कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो.

येथे क्लिक करा