

आधुनिक जीवनशैलीत वाढते वजन हे अनेक रोगांना निमंत्रण देणारे ठरत आहे. वजन कमी करण्यासाठी व्यायामाबरोबर आहारावरही नियंत्रण महत्त्वपूर्ण ठरते. वजन कमी करण्याबरोबरच हृदयविकार व चयापचयाशी संबंधित जोखमीचे घटक कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंग (Intermittent Fasting) हे कॅलरी-प्रतिबंधित आहारांइतकेच प्रभावी असल्याचे नवीन संशोधनात स्पष्ट झाले 'हेल्थ लाईन'ने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. जाणून घेवूया इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय? कॅलरी मर्यादित आहारा सारखचा त्याचा नेमका कसा फायदा होतो याविषयी...
इंटरमिटेंट फास्टिंग याचा अर्थ दिवसभरातील ठराविक वेळेस आहार घेणे व उर्वरित वेळेत उपवास पाळणे असा आहे. ठराविक तास सलग उपवास करणे हे आरोग्यास फायदेशीर मानले जाते. वजन कमी करण्याबरोबरच चयापचय सुधारणा करण्यासाठी अशा प्रकारे उपवास केले जातात. इंटरमिटेंट फास्टिंग (आयएफ)मध्ये आहार घेणे आणि उपवासाचे विशिष्ट कालावधी ठरलेला असतो. तुम्ही काय खाता यापेक्षा केव्हा खाता यावर जास्त भर दिला जातो. यामध्ये एक दिवसाआड उपवास (ADF) यात एक दिवस सामान्य जेवण आणि दुसऱ्या दिवशी उपवास किंवा खूप कमी कॅलरीयुक्त आहार घेतला जातो. वेळेनुसार मर्यादित आहार ( TRE) यामध्ये दररोज ठराविक वेळेतच (सामान्यतः ८ किंवा १२ तास) अन्न सेवन मर्यादित ठेवले जाते. संपूर्ण दिवस उपवास (Whole day fasting) याला ५:२ डाएट असेही म्हणतात. याचा अर्थ आठवड्यातून दोन दिवस सलग उपवास केला जातो. याउलट पारंपारिक कॅलरी निर्बंध (सीआर) मध्ये दररोज विशिष्ट कॅलरीचे लक्ष्य ठेवले जाते. यामध्ये कोणत्याही वेळी खाण्याची परवानगी असते.
१८ जून रोजी ‘द बीएमजे ट्रस्टेड सोर्स’ (The BMJTrusted Source) मध्ये प्रकाशित झालेल्या अध्ययनात असे दिसून आले की, इंटरमिटेंट फास्टिंग (आयएफ) आणि पारंपारिक कॅलरी निर्बंध (सीआर ) दोन्ही पध्दतींमुळे आरोग्यासाठी सारखेच फायदे मिळतात. आयएफ आणि सीआर यांच्यात केलेल्या अध्ययतान सर्व प्रकारच्या आयएफ प्रकार आणि पारंपारिक सीआर मुळे वजन कमी झाले. तीन मुख्य आयएफ पद्धतींपैकी, फक्त एक दिवसाआड उपवासामुळे (ADF) 'सीआर' पेक्षा जास्त वजन कमी झाले. मात्र या निष्कर्षांची पुष्टी करण्यासाठी दीर्घ कालावधीच्या चाचण्यांची आवश्यकता असल्याचेही या अध्ययनात नमूद करण्यात आले आहे.
या नवीन संशोधनाबाबत सांगताना टेम्पल युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर ओबेसिटी रिसर्च अँड एज्युकेशनचे संचालक आणि द ओबेसिटी सोसायटीचे प्रवक्ते डॉ. डेव्हिड सार्वर म्हणतात , "वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमच्या जीवनशैलीशी जुळणारा आणि तुम्ही दीर्घकाळ टिकवू शकाल असा मार्ग शोधणे. मागील दशकात 'आयएफ'ची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे; परंतु पारंपारिक, कॅलरी-प्रतिबंधित आहारांच्या तुलनेत वजन कमी होणे आणि रक्तातील साखरेची पातळी यामध्ये विसंगत आढळते."
संशोधकांनी ६,५०० प्रौढांनी संशोधनात सहभागी घेतला. सहभागींचे सरासरी वय ४५ होते. त्यापैकी दोन तृतीयांश महिला होत्या. संशोधनात सहभागी झालेल्यांपैकी सुमारे ९०% लोकांना आधीपासूनच आरोग्य समस्या होत्या. यामध्ये अधिक वजन असने. लठ्ठपणा आणि टाइप १ व टाइप २ मधुमेह यांचा समावेश होता. सहभागींचा सरासरी ३१ (बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) ३० किंवा जास्त) होता. संशोधनात असे आढळले की, अनियंत्रित आहाराच्या तुलनेत आयएफ आणि सीआर दोन्हीमुळे शरीराच्या वजनात थोडी घट झाली. 'इंटरमिटेंट फास्टिंग'च्या विविध पर्यायांपैकी फक्त फक्त एक दिवसाआड उपवासामुळे (ADF) मुळे पारंपारिक कॅलरी निर्बंध (सीआर ) पेक्षा किंचित जास्त वजन कमी झाले ( सुमारे तीन पौंड).
वरील संशोधन सांख्यिकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असले तरी, वजनाशी संबंधित आरोग्य समस्या सुधारण्यासाठी असे अतिरिक्त वजन कमी होणे नगण्य असल्याचे डॉ. डेव्हिड सार्वर यांनी नमूद केले आहे. मर्यादित आहाराच्या तुलनेत ADF मुळे एकूण आणि LDL कोलेस्टेरॉलमध्ये थोडी सुधारणा झाल्याचे आढळले आहे.
इंटरमिटेंट फास्टिंग याचा अर्थ दिवसभरातील ठराविक वेळेस आहार घेणे व उर्वरित वेळेत उपवास पाळणे असा आहे. आजच्या काळातील सर्वोत्तम आहार म्हणून ओळखले जात असले तरी, त्याचे समर्थन करण्यासाठी अद्याप पुरेसे ठोस पुरावे नाहीत. तरीही, ते अनेक आरोग्य फायद्यांशी जोडले गेले आहे. यामध्ये वजन कमी होणे, सुधारित इन्सुलिन प्रतिरोध, शरीरावरील सूज कमी होणे आदींचा समावेश आहे. मात्र इंटरमिटेंट फास्टिंग पारंपारिक कॅलरी निर्बंध (सीआर ) पेक्षा अधिक उपयोगी आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, २०२२ मध्ये NEJM मध्ये प्रकाशित संशोधनात असा निष्कर्ष काढण्यात आला होता की, लठ्ठपणा असलेल्या लोकांमध्ये, CR पेक्षा TRE अधिक फायदेशीर नव्हते.दुसरीकडे, NIH द्वारे निधीबद्ध केलेल्या एका क्लिनिकल चाचणीत, ज्याचे परिणाम एप्रिल २०२५ मध्ये प्रकाशित झाले, त्यात सहभागींनी संपूर्ण दिवसाच्या उपवासाचा एक प्रकार (अधिक सामान्य ५:२ ऐवजी ४:३ म्हणजे आठवड्यातील तीन दिवस उपवास असा केला होता, त्यांनी एका वर्षानंतर CR पेक्षा ५०% जास्त वजन कमी झाल्याचे निदर्शनास आले होते.
अभ्यासाचा एक अंतिम उल्लेखनीय निष्कर्ष असा होता की, चाचण्या जितक्या जास्त काळ चालल्या तितके पालनाचे दर झपाट्याने कमी झाले. २४ आठवड्यांपेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासांमध्ये ८०% पेक्षा जास्त उपवासाचे पालन दिसून आले, तर ५२ आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीच्या चाचण्यांमध्ये सामान्यतः कमी पालन नोंदवले गेले. संपूर्ण दिवसाच्या उपवासाच्या एका चाचणीत, सहा आठवड्यांत ७४% असलेले पालन ५२ आठवड्यांत फक्त २२% पर्यंत घसरले. आहार प्रोटोकॉल "सर्वांसाठी एकच" म्हणून पाहिले जाऊ नये, तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनशैलीनुसार तयार केले पाहिजे, असेही नवीन संशोधन स्पष्ट करते.