

फिटनेस आणि आरोग्याच्या शोधात आपण क्विनोआ, चिया सीड्ससारख्या विदेशी पदार्थांकडे वळतो. पण आपल्या स्वयंपाक घरातच खरा हिरा लपलेला आहे, तो म्हणजे 'मुग'. मुग डाळ, सूप किंवा चटपटीत मुग चिला हे सर्व स्वस्त, चविष्ट आणि आरोग्यासाठी गुणकारी आहेत.
प्रोटीनचा नैसर्गिक स्रोत: मुगमध्ये सहज पचणारे प्रोटीन भरपूर प्रमाणात असते, जे शरीराच्या दुरुस्तीसाठी आवश्यक आहे.
वजन कमी करण्यात मदत: कमी कॅलरी आणि जास्त पोषणमूल्यामुळे मुग वजन कमी करणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे.
ब्लड शुगर नियंत्रण: मुगचा Glycemic Index कमी असल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते, डायबेटिस रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.
हृदयासाठी लाभदायक: कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते, त्यामुळे हृदय निरोगी राहते.
आयर्न आणि फोलेट (Iron + Folate) : अॅनिमिया कमी करण्यासाठी उपयुक्त.
फायबरचे भरपूर प्रमाण: पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठता दूर होते.
रोजची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते: इम्युनिटीला सपोर्ट मिळतो.
लिव्हर डिटॉक्स: मुग सूपमुळे यकृत स्वच्छ राहते.
त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त: त्वचेला ग्लो आणि केसांना वाढ मिळते.
पचायला हलका: लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी योग्य.
सकाळी अंकुरित मुग: चविष्ट आणि पौष्टिक.
मुग चिला: हलका, प्रोटीन-युक्त आणि सुपर टेस्टी.
मुग डाळची खिचडी किंवा सूप: झटपट तयार होणारे आणि पचायला सोपे.
डायबेटिस रुग्ण: अंकुरित मुग प्रमाणात घ्या, रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
वजन कमी करणारे: मुग चिला हा मैद्याचा उत्तम पर्याय.
हृदय रुग्ण: उकडलेला मुग आणि भाज्या परफेक्ट हलके डिनर
मुग हा प्रोटीन-युक्त, सहज पचणारा आणि डायबेटिक-फ्रेंडली आहे. आजच गव्हाऐवजी कुरकुरीत मुग चिला ट्राय करा आणि आपल्या आरोग्यात सकारात्मक बदल अनुभवा. थोडा मुग रोजच्या डिशमध्ये घालून फिटनेसचा गेम पूर्ण करा, असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे.