Curd Health Benefits | दही खाणे फायदेशीर, पण अतिसेवन केल्यास ठरू शकते हानिकारक
अविनाश सुतार
लॅक्टोबॅसिलस आणि बिफिडोबॅक्टेरियम सारख्या प्रोबायोटिक्सने समृद्ध असलेले दही पचन सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवते
दह्यातील नैसर्गिक चांगले जीवाणू आतड्यांतील जैविक समतोल राखण्यास मदत करतात, ज्यामुळे दही बहुतेक लोकांसाठी उत्तम आहार ठरतो
दही हे कॅल्शियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी१२, रायबोफ्लेविन यांसारख्या महत्त्वाच्या जीवनसत्त्वांचे चांगले स्रोत आहे, जे हाडे मजबूत ठेवण्यासाठी व शरीराला ऊर्जा मिळवून देण्यासाठी आवश्यक असतात
अति प्रमाणात दही खाल्ल्यास आतड्यांतील सूक्ष्मजीवांचा नाजूक समतोल बिघडू शकतो
प्रोबायोटिक्सचे अती सेवन काही विशिष्ट जीवाणूंची संख्या वाढवते आणि अन्य आवश्यक सूक्ष्मजीवांचे प्रमाण कमी करते
गॅस व पोट फुगणे, बद्धकोष्ठता किंवा अतिसार, अपचन किंवा पोटात मुरकुंडी असे त्रास होऊ शकतात