Late-night eating risks: रात्री उशिरा जेवल्यामुळे शरीरात होतात गंभीर बदल; काय सांगतो नवा अभ्यास?

आपण 'काय आणि किती खातो' यापेक्षा आपण 'कधी खातो' हे अधिक महत्त्वाचे आहे. रात्री उशिरा खाण्याची सवय तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते, असा इशारा नव्या संशोधनातून देण्यात आला आहे.
Late-night eating risks
Late-night eating risksFile Photo
Published on
Updated on

Late-night eating risks

नवी दिल्ली: आपण 'काय आणि किती खातो' यापेक्षा आपण 'कधी खातो' हे अधिक महत्त्वाचे आहे. रात्री उशिरा खाण्याची सवय तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते, असा इशारा एका नव्या संशोधनातून देण्यात आला आहे. उशिरापर्यंत जागल्यामुळे आणि त्या वेळी उच्च कॅलरी असलेले अन्न खाल्यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडते आणि शरीरात अनेक गंभीर बदल घडून येतात, असा निष्कर्ष या अभ्यासात काढण्यात आला आहे.

संशोधनात काय आले समोर?

'फ्रंटियर्स इन न्यूट्रिशन' या प्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. या अभ्यासानुसार, जे लोक रात्री उशिरापर्यंत जागून जास्त ऊर्जा, कार्बोहायड्रेट्स आणि चरबीयुक्त पदार्थांचे सेवन करतात, त्यांच्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होतात.

Late-night eating risks
Akshay Kumar diet plan: अक्षय कुमारच्या फिटनेसच्या सवयी: झोप, व्यायाम आणि आहाराबद्दलची माहिती

या सवयींमुळे खालील आरोग्य बिघडत

शरीरातील चरबीचे प्रमाण वाढणे: एकूण बॉडी फॅटमध्ये झपाट्याने वाढ होते.

पोटाची चरबी वाढणे: पोटाभोवती अतिरिक्त चरबी जमा होऊन 'बेली फॅट' वाढते.

रक्तातील साखरेचे प्रमाण बिघडणे: ब्लड शुगर लेव्हल वाढून मधुमेहाचा धोका निर्माण होतो.

लिपिड लेव्हल वाढणे: रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि लिपिडची पातळी अनियंत्रित होते.

खाण्याच्या वेळेचा पचनक्रियेवर थेट परिणाम

ऑस्ट्रेलियाच्या ग्रिफिथ युनिव्हर्सिटीतील 'स्कूल ऑफ अलाईड हेल्थ, स्पोर्ट्स अँड सोशल वर्क'च्या प्रमुख संशोधक रोझेन क्रुगर यांनी या संशोधनाचे नेतृत्व केले. त्यांच्या मते, आपल्या शरीराचे नैसर्गिक घड्याळ आपल्या आहाराच्या निवडीवर आणि पचनक्रियेवर थेट परिणाम करते. अभ्यासात एक मनोरंजक बाब समोर आली आहे. सकाळी लवकर उठणारे आणि रात्री उशिरापर्यंत जागणारे, दोघेही दिवसभरात जवळजवळ समान प्रमाणातच अन्नाचे सेवन करतात. म्हणजेच, समस्येचे मूळ जास्त खाण्यात नसून अयोग्य वेळी खाण्यात आहे.

महिलांवर करण्यात आला विशेष अभ्यास

संशोधकांनी १८ ते ४५ वयोगटातील २८७ महिलांच्या आहाराच्या सवयींचा बारकाईने अभ्यास केला. यात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत जागणार्‍या महिला सकाळी अगदी कमी ऊर्जा आणि कमी प्रोटीन असलेला आहार घेतात. सकाळी कमी खाल्ल्याची भरपाई या महिला रात्री उशिरा जास्त कार्बोहायड्रेट्स आणि फॅटयुक्त अन्न खाऊन करतात. रात्रीच्या वेळी सक्रिय असणाऱ्या महिलांच्या आहारात सूक्ष्म पोषक घटकांची मोठी कमतरता आढळून आली.

Late-night eating risks
Human Sixth Sense: मानवाकडेही असते सहावे इंद्रिय? महिलांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक सक्रिय, संशोधनातून गुपित उलगडलं

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news