काळजी अँजिओप्लास्टीनंतरची

काळजी अँजिओप्लास्टीनंतरची

Published on

पूर्वी वयाची साठी ओलांडल्यानंतर हृदयविकाराची व्याधी मागे लागत असे. अलीकडे चाळिशी ओलांडलेल्या मंडळींमध्येही हृदयविकाराचे प्रमाण आढळून येऊ लागले आहे. यामुळेच अँजिओप्लास्टी (Angioplasty) शस्त्रक्रिया हा सध्याच्या काळातील सर्वसामान्य उपचार बनला आहे. अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णाचा हृदयविकाराचा धोका पूर्णपणे टळला, असे मानता येत नाही. या शस्त्रक्रियेनंतरही रुग्णाला अनेक प्रकारे आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक ठरते.

संबंधित बातम्या 

हृदयाला होणार्‍या रक्तपुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यावर हृदयविकाराचा झटका येतो. हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्या आपले काम व्यवस्थित करू शकत नाहीत. रक्तवाहिन्यांचे हृदयापर्यंत रक्त पोहोचविण्याच्या कामात अडथळे येण्यात अनेक कारणे असतात. अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेद्वारे हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांची दुरुस्ती केली जाते. या रक्तवाहिन्यांची दुरुस्ती औषधे घेऊन होत नसते म्हणून शस्त्रक्रिया करण्याची गरज भासते.

काही रुग्ण हृदयात दुखते आहे म्हणून वेगवेगळी औषधे घेत असतात. ही औषधे घेऊनही त्यांचे छातीत दुखणे थांबत नाही. अशा वेळी त्या रुग्णांवर गरजेनुसार अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली जाते. या शस्त्रक्रियेद्वारे रक्तवाहिन्या रुंद केल्या जातात.

व्यायामाचा अभाव, अयोग्य आहार आणि तणावाची जीवनशैली यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साठणे चालू होते. रक्तवाहिन्यांमधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यास हृदयाला होणार्‍या रक्तपुरवठ्यात अडथळे येतात. या वाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ लागतात.

Angioplasty : कोणत्याही कारणामुळे औषधे घेणे टाळू नका

रक्तवाहिन्यांचे काम पूर्णपणे ठप्प होऊन जाते. रक्तपुरवठा थांबला की, हृदयाचे कामही थांबते. म्हणून छातीत दुखते आणि हृदयविकाराचा झटका येतो. अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉक्टरांकडून जी औषधे घेण्यास सांगितलेली असतात, ती औषधे वेळेवर घेणे आवश्यक ठरते. कोणत्याही कारणामुळे औषधे घेणे टाळू नका. शस्त्रक्रिया झाली म्हणजे आपल्या हृदयाला नियमितरीत्या रक्तपुरवठा होतो आहे, असे समजू नका.

शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियमितरीत्या तपासा

आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियमितरीत्या तपासा. शरीराचा रक्तदाब नियंत्रणात राहील, याकडे आवर्जून लक्ष द्या. कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणाबरोबरच डॉक्टरांकडून रक्तदाबही तपासून घ्या. रुग्णाला मधुमेह असेल, तर मधुमेहाची औषधेही वेळच्यावेळी घेणे आवश्यक आहे.

व्यायाम न चुकता करा, जड सामान उचलणे टाळा

डॉक्टरांकडून जे व्यायाम सुचविले गेले आहेत, ते व्यायाम दररोजच्या दररोज न चुकता करणे गरजेचे आहे.याखेरीज आहार नियोजनावर, पथ्यपाण्यावर लक्ष द्या. डॉक्टरांनी सांगितलेला आहार कटाक्षाने घ्या. मोह झाला म्हणून तेलकट, तळलेले, गोड पदार्थ खाऊ नका. धूम्रपान पूर्णपणे बंद करा. आपल्या प्रकृतीची डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घ्या. वजन वाढत नाही ना, याकडेही लक्ष द्या. महिना ते पंधरा दिवसाला आपले वजन तपासून बघा. जड सामान उचलणे टाळा. ज्या खेळामुळे अथवा व्यायामामुळे खूप दमणूक होते आहे असे दिसले, तर असे खेळ आणि व्यायाम टाळा.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news