Liver Health : वाईट सवयींचा परिणाम यकृतावर

वाईट सवयी यकृताला करतात नुकसान
Effects of bad habits on liver
यकृताचे विकार होण्याचे प्रमाण दिसून येत आहे. यासाठी कारण आहे म्हणजे जीवनशैलीतील बदल.Pudhari File Photo
डॉ. भारत लुणावत

हल्ली यकृताचे विकार होण्याचे प्रमाण दिसून येत आहे. यासाठी कारण आहे म्हणजे जीवनशैलीतील बदल. आहार विहारातील बदलाचाही मोठा परिणाम होतो. दीर्घकाळ शरीरात दिसून येणारे बदल नजरेआड करणे, या सर्वांमुळे यकृताशी निगडित त्रास वाढतात. सुमारे पाचशेहून अधिक क्रियांमध्ये यकृताची भूमिका फार महत्त्वाची असते. शरीराची चयापचयक्रिया योग्य राखण्याचे कामही यकृत करत असते. आपण खाल्लेले अन्न पचवून त्यापासून उर्जेची निर्मिती करणे आणि शरीरातील वाईट पदार्थ काढून टाकण्याचे कामही यकृत करते. रक्त हे शरीराचा आरसा आहे असे म्हटले जाते. रक्त स्वच्छ राखण्यातही यकृताचे कार्य महत्त्वाचे असते. रक्तातील टाकाऊ पदार्थ गाळण्याचे काम यकृतालाच करायचे असते. त्यामुळेच यकृताचे काम बिघडू नये, यासाठीच प्रयत्न करायला हवे. कारण, यकृताचे काम बिघडले, तर अनेक प्रकारांचे विकार शरीरात घर करू शकतात.

Effects of bad habits on liver
OBC Reservation: हाके-वाघमारे यांची ओबीसी संवाद यात्रा

यकृताचे आरोग्य खूप बिघडले तर यकृताची दुरुस्ती करणे सोपी गोष्ट नाही. वेगवान झालेल्या आयुष्यात शरीर दर्शवत असलेल्या लक्षणांकडे आपले लक्ष नसते. अर्थात विविध विकारांची लक्षणे निरनिराळी असतात. मात्र, यकृताच्या काही रोगांमध्ये दिसणारी काही सर्वसामान्य लक्षणे आहेत. जसे त्वचा, डोळे पिवळे पडणे, पोट किंवा पायाच्या घोट्याला सूज येणे, उलटी होणे, भूक कमी लागणे, सतत चक्कर येणे, खाज जाणवणे, लघवी अतिपिवळी होणे, शौचाला रक्तपडणे.

Effects of bad habits on liver
पंतप्रधान मोदी जनादेश नाकारण्याचा प्रयत्न करत आहेत : मल्लिकार्जुन खर्गे

हेपेटायटिस किंवा कावीळ

यकृताशी निगडित सर्वात मोठी समस्या म्हणजे हेपेटायटिस. यकृतामध्ये विषाणू संसर्ग झाल्याने कावीळ होते. त्यामुळे यकृताला सूज येते. हा संसर्ग वाढला तर यकृत पूर्णपणे खराब होते. हेपेटायटिस किंवा कावीळ पाच प्रकारांची असते. हेपेटायटिस ए, बी, सी, डी आणि ई. हेपेटायटिस ए आणि ई हे हेपेटायटिस चे प्रकार दूषित पाणी आणि दूषित अन्न यांच्या सेवनाने होतात. मुले आणि वृद्ध लोक यांच्यामध्ये ही कावीळ होण्याचे प्रमाण अधिक असते. खूप गर्दीच्या ठिकाणी जिथे स्वच्छतेची फारशी काळजी घेतली जात नाही, अशा ठिकाणी या हेपेटायटिस संसर्गाचा प्रभाव अधिक दिसून येतो. तर हेपेटायटिस बी, सी आणि डी हे संक्रमित व्यक्तीच्या रक्त किंवा इतर द्रव्य पदार्थांच्या संपर्कात आल्याने होते. हेपेटायटिस ए आणि सी यांचा संसर्ग हा गंभीर असल्याचे मानले जाते. हा संसर्ग पुढे जाऊन लिव्हर सिरोसिस आणि कर्करोग होण्यासही कारण ठरते. हेपेटायटिस टाईप ए आणि बी यापासून बचाव करण्यासाठी लस उपलब्ध आहे. तर हेपेटायटिस सी आणि ई यांच्यासाठी मात्र काहीही लस उपलब्ध नाही.

Effects of bad habits on liver
Sri lanka Cricket : श्रीलंकन मुख्‍य प्रशिक्षक सिल्‍वरवूडचा राजीनामा

लिव्हर सिरोसिस

हा विकार निश्चितच गंभीर आहे. कारण, यामध्ये यकृताला कायमस्वरूपी इजा होऊ शकते. यकृत आकुंचन पावते आणि कडक होते. लिव्हर सिरोसिसमध्ये यकृताच्या पेशी नष्ट होतात त्यांची जागा तंतुमय घटक घेतात. आहाराच्या चुकीच्या सवयी, अतिमद्यपान यामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते. जास्त चरबीयुक्त पदार्थ, मांसाहारी पदार्थ सेवन केल्याने ही समस्या निर्माण होऊ शकते. रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते आणि काही विशिष्ट औषधांमुळेही ही समस्या निर्माण होते. यकृताला झालेला हा संसर्ग प्रमाणाबाहेर वाढल्यास केवळ लिव्हर ट्रान्सप्लांट हा एकच उपाय करता येतो.

Effects of bad habits on liver
'मैत्री प्रकाशन'चे दयानंद कनकदंडे यांचा आकस्मिक मृत्यू

यकृताचा कर्करोग

यकृताच्या कर्करोगात यकृताच्या पेशी नष्ट होतात. यकृताचा कर्करोग दोन प्रकारांचा असतो. पहिला यकृताच्या पेशीपासून सुरू होतो, तर दुसर्‍या प्रकारात कर्करोग दुसर्‍या अवयवांपासून सुरू होऊन यकृतापर्यंत पोहोचतो. लिव्हर सिरोसिस, फॅटी लिव्हर किंवा काविळीचे प्रमाण वाढले तरीही यकृताचा कर्करोग होऊ शकतो. विस्तृत तपासण्यांनंतर कर्करोगावर रेडिएशन, किमोथेरेपी, शस्त्रक्रिया आदी उपचार केले जातात. गंभीर प्रकरणांमध्ये ट्रान्सप्लांटही केले जाऊ शकते.

Effects of bad habits on liver
'नीट' प्रकरणी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचा NTA इमारतीवर हल्‍लाबोल

फॅटी लिव्हर

यकृताच्या पेशींमध्ये चरबी जमा झाल्यास फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होते. गरजेपेक्षा जास्त चरबी जमा झाल्याने यकृताच्या पेशी कडक होतात. फॅटी लिव्हरशी निगडित समस्या या दोन प्रकारांच्या असतात. अतिमद्यपानामुळे होणारा फॅटी लिव्हर हा आजाराचा एक प्रकार तर दुसरा नॉन अल्कोहोलिक म्हणजे मद्यपान न करताही होणारा विकार. अर्थात या विकाराची लक्षणे स्पष्टपणे दिसत नाहीत. पण, काही व्यक्तींना खूप जास्त थकवा आणि यकृताचा आकार वाढत असल्याचेही दिसून येते. स्थूलता, मधुमेह टाईप टू या विकारांनी ग्रस्त रूग्णांमध्ये हा विकार होण्याची शक्यता अधिक असते. अ‍ॅस्प्रिन, स्टिरॉईडचे अतिसेवन केल्यासही हा त्रास होतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news