Dayanand Kanakdande
दयानंद कनकदंडे यांचा आकस्मिक मृत्यू झाला Pudhari News Network

'मैत्री प्रकाशन'चे दयानंद कनकदंडे यांचा आकस्मिक मृत्यू

चळवळीची हानी झाल्याची भावना
Published on

पिंपरी: पुढारी वृत्तसेवा : समतावादी चळवळीतील कार्यकर्ते तसेच मैत्री प्रकाशनचे प्रमुख दयानंद कनकदंडे यांनी फ्लॅटच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २५) रात्री नऊच्या सुमारास दिघी येथे घडली. त्यांच्या अचानक जाण्याने चळवळील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Dayanand Kanakdande
पुणे ग्रामीण | आदिवासी भागात राहण्यास कर्मचारी नाखूष

दयानंद कनकदंडे समतावादी चळवळीतील सक्रिय सदस्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दयानंद कनकदंडे हे समतावादी चळवळीतील सक्रिय सदस्य होते. दिघी येथील एका सोसायटीत ते राहत होते. दरम्यान, मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास त्यांनी तिसऱ्या मजल्यावरील आपल्या घराच्या गच्चीतून पडून त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, आई, वडील असा परिवार आहे.

Dayanand Kanakdande
पुणे ग्रामीण | बारामती तालुक्यात युरियाची कृत्रिम टंचाई

चळवळीची मोठी हानी

दयानंद यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोक भावना व्यक्त आहेत. दयानंद यांच्या जाण्याने चळवळीची मोठी हानी झाल्याचे मेसेज पोस्ट केले आहेत. याबाबत दिघीचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कनकदंडे यांच्या मृत्युबद्दल तपास सुरू असल्याचे सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news