'नीट' प्रकरणी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचा NTA इमारतीवर हल्‍लाबोल

NSUI च्‍या कार्यकर्त्यांनी इमारतीमध्‍ये घुसून दरवाजे केले बंद
NEET UG
NEET-UG परीक्षेतील अनियमिततेच्या निषेधार्थ काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI ने गुरुवारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) कार्यालयावर धडक दिली. ANI photo

वैद्‍यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेचा (NEET) पेपरफुटीचा प्रकार समोर आल्‍याने देशभरात खळबळ माजली आहे. NEET-UG परीक्षेतील अनियमिततेच्या निषेधार्थ काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI ने गुरुवारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) कार्यालयावर धडक दिली. संस्थेच्या अनेक सदस्यांनी इमारतीत प्रवेश करून अनेक दरवाजे आतून बंद केल्याचे वृत्त ANIने दिले आहे.

या घटनेचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील काही लोक एनटीए इमारतीत घुसून घोषणाबाजी करताना दिसत आहेत. एनटीए बंद करा, एनटीए मुर्दाबाद अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्‍या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह सुरक्षा दलांनी घटनास्‍थळी धाव घेत परिस्‍थिती नियंत्रणात आणण्‍याचा प्रयत्‍न केला. भारतीय युवक काँग्रेस (IYC) ने NEET UG परीक्षेतील गैरप्रकाराबद्दल जंतरमंतरजवळ निदर्शनेही केली. अनेक आयवायसी कामगार निषेधासाठी जंतरमंतरवर जमले, त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news