Back Pain : कंबरदुखीने त्रस्त आहात? 'हा' व्यायाम प्रकार ठरेल फायदेशीर | पुढारी

Back Pain : कंबरदुखीने त्रस्त आहात? 'हा' व्यायाम प्रकार ठरेल फायदेशीर

डॉ. प्राजक्ता गायकवाड

वय जसं वाढतं, तसा कंबरदुखीचा त्रास अनेकींना जाणवू लागतो. काहीजणींमध्ये हे दुखणं इतकं त्रासदायक असतं की रोजच्या कामासोबतच उठणं, झोपणं या शरीराच्या साध्या हालचालीही अवघड बनतात; पण आपण नियमित व्यायाम करून पोटावर असलेली अनावश्यक चरबी कमी केल्यास त्याचा परिणाम लगेच कंबरदुखीवरही जाणवू शकतो. ( Back Pain )

संबंधित बातम्या 

पोटाचे आणि कंबरेचे काही खास व्यायाम प्रकार आहेत. ते केल्यास नक्कीच फायदा मिळतो. पोटाचे व्यायाम पोटाच्या स्नायूंसाठी करतात. पोटाचे व्यायाम करण्याआधी पाणी पिऊ नये. त्यामुळे पोट दुखण्याची शक्यता जास्त असते. पोटावरील चरबी कमी करून पोट कमी करण्याआधी पाठ मजबूत होणं आवश्यक आहे. ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी हे व्यायाम करण्याआधी स्ट्रेचेस केले आणि नंतर हे व्यायाम केले तर व्यायामाचे परिणाम चांगले होतात.

संबंधित बातम्या

व्यायाम

आधी जमिनीवर ताठ झोपावं. पाय गुडघ्यात वाकवावे. पाठ आणि नितंब जमिनीला टेकलेले असले पाहिजे. दोन्ही हात डोक्याखाली ठेवायचे. हनुवटी छातीला टेकावी. नजर छताकडे ठेवावी. पाठीचा वरचा भाग उचलला जाईल इतपत उठायचं आणि परत टेकायचं. टेकताना फक्त खांदे जमिनीला टेकतील. मान खाली टेकवायची नाही. उठताना पोटाच्या स्नायूंची मदत आणि ताकद घ्यायची असते. उठताना श्वास सोडायचा आणि टेकताना श्वास घ्यायचा. उठताना सामान्य गतीनं उठावं आणि टेकताना त्याहीपेक्षा हळू टेकावं. हा व्यायाम करताना मानेला झटका बसायला नको.दहा ते पंधरा रिपिटेशनचा एक सेट याप्रमाणे तीन सेटमध्ये हा व्यायाम करावा. सुरुवातीला एक सेट करावा. सवयीनं तीन सेट जमतात.

क्रंचेस करताना श्वासोच्छवास नियमित घ्यायचा; पण तो एका र्‍हिदममध्ये घ्यायचा आहे. व्यायाम करताना कंबरेवर ताण जाणवल्यास व्यायाम थांबवावा. ज्यांना स्पॉन्डिलेसिस, कंबरदुखीचा त्रास आहे, त्यांनी हा व्यायाम करू नये. हा व्यायाम खास पोटाच्या स्नायूंसाठी असून तो नियमित केल्यास पोटावरची चरबी कमी होते. व्यायाम तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा. ( Back Pain )

Back to top button