Walking Steps : ​दररोज किती पावले चालावे? जाणून घ्‍या नवीन संशोधन काय सांगते? | पुढारी

Walking Steps : ​दररोज किती पावले चालावे? जाणून घ्‍या नवीन संशोधन काय सांगते?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : निरोगी आरोग्‍यासाठी दररोज किती पावले चालावे, असा प्रश्‍न विचारला जातो.  १० हजार पावले चालणे (Walking Steps ) हे निरोगी आरोग्‍यासाठी लाभदायक ठरते, असे काही संशाेधनातील निष्‍कर्ष सूचवत हाेते. आता एका नवीन अभ्‍यासात असे आढळले आहे की, दररोज ८ हजार ८०० पावले चालले तरी हृदयविकारामुळे होणार्‍या आकस्‍मिक मृत्‍यूचा धोका कमी होवू शकतो. जाणून घेवूया नवीन संशोधनातील माहिती.

Walking Steps : ८,८०० पावले चालणे आरोग्‍यासाठी लाभदायक

चालणे या व्‍यायामावर स्‍पेनमधील ग्रॅनाडा विद्यापीठाच्या नेतृत्वाखालील एका नवीन मेटा-विश्लेषण करण्‍यात आले. ‘जर्नल ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी’मध्ये हे विश्‍लेषण प्रकाशित झाले आहे. यामध्‍ये नमूद करण्‍यात आले आहे की, ८,८०० पावले चालणे आरोग्‍यासाठी लाभदायक ठरते. हळूहळू चालण्यापेक्षा वेगाने चालणे अधिक फायदेशीर ठरते. वेगाने चालाल तितका अकाली मृत्यूचा धोका कमी होता, असेही या अभ्‍यासात नमूद करण्‍यात आले आहे.

संशोधकांनी 1.1 लाखाहून अधिक सहभागींचा समावेश असलेल्या 12 आंतरराष्ट्रीय अभ्यासांमधील डेटाचे विश्लेषण केले. त्यांनी नियमित चालणे व हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग यांच्यातील संबंधांचे परीक्षण केले. टीमला आढळले की 8,800 पावले दररोज चालण्यासाठी योग्य आहेत. सर्व कारणांमुळे होणार्‍या मृत्यूचा धोका कमी होतो.

 दररोज ७,२०० पावले चालणे आवश्‍यक

हृदयविकारामुळे मृत्यूचा धोका कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले तर दररोज ७,२०० पावले चालणे आवश्‍यक ठरते. अतिरिक्त पावले जीवनाचा दर्जा, मानसिक आरोग्य इ. यासारख्या इतर टोकांसाठी फायदेशीर ठरू शकते, असे संशोधक थिज इजस्वोगेल्स यांनी म्‍हटले आहे. संशोधकांना असे आढळून आले की, दररोज चालण्‍याच्‍या पावलांची संख्या वाढवल्याने लक्षणीय फायदे होऊ शकतात. उदाहरणार्थ, जे लोक कमी व्यायाम करतात, त्यांच्यासाठी सुमारे 500 अतिरिक्त पाऊल त्यांच्या आरोग्यामध्ये आणखी सुधारणा करू शकते. पूर्वीच्या अभ्‍यासामध्‍ये दैनंदिन पावले 10,000 नसेल, परंतु ती 8,000 पावलांच्या जवळ आहे, असे नवीन संशोधन सूचित करते.

हेही वाचा :

 

Back to top button