Health Advice : व्यावसायिकांसाठी आरोग्यसल्ला

Health Advice
Health Advice
Published on
Updated on

दुकानात बसणारे (किंवा दिवसभर उभे राहणारे!) व्यावसायिक, याचं सगळं आरोग्य हे त्यांच्या रोजच्या दिनक्रमावर बहुतांशी अवलंबून असतं. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना करायला लागणार्‍या वेळेच्या तडजोडी या कित्येकदा अनेक रोगांना निमंत्रण देणार्‍या ठरतात. म्हणूनच त्यांचा दिनक्रम, त्यामुळे निर्माण होणारे आजार आणि ते होऊ नयेत यासाठी पाळावयाचे व्यावहारिक सोपे नियम आहेत.

संबधित बातम्या 

साधारणतः दुकानदार, मग ते कोणत्याही प्रकारचे असोत, त्यांची व्यवसायाची वेळ साधारणपणे सकाळी दहा ते रात्री साडेआठ नऊ वाजेपर्यंत म्हणजे सुमारे अकरा तास असते. या कालावधीत क्वचितच त्यांना विश्रांती मिळते; अन्यथा व्यवसायिकांचे कार्य अखंडपणे सुरू असत. विश्रांती न घेता केलेलं हे काम घरी गेल्यावर काहीही करावेसे न वाटणं, भूक नसणं, काही तरी खायचं म्हणून दोन घास खाणं आणि रात्री व्यवसायाचे विचार थोपवत थोपवत झोपणे असा सगळा उद्योग त्यांचा असतो. दिवसभराच बैठ (किंवा फारशी हालचाल नसलेले) काम दुकानात केलं जात असल्यामुळे जठराग्नी मंद होणे, भूक न लागणे, खाल्लेले नीट न पचणे, अशा प्रकारच्या तक्रारींना या दुकानदार मंडळींना प्रामुख्याने तोंड द्यावं लागत, पोटात गॅसेसचा त्रास, अन्न पुढे न सरकणं, त्यामुळे निर्माण होणारा मलावरोध या गोष्टी ओघानेच आल्या.

या टाळण्यासाठी सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे या दुकानदार व्यावसायिकांनी रोज थोड तरी फिरलं पाहिजे. ते फिरणं शक्यतो सकाळी असावं. अर्थात, एकावेळी पायांवर खूप ताण येईल एवढं फिरू नये. पोट मोकळं राहणं इतपतच हे फिरण असावं, याचबरोबर सूर्यनमस्कारासारखा काही व्यायामही त्यांनी करावा. याने त्यांचे स्नायू, सांधे बळकट राहायला मदत होईल. त्रिफळा चूर्णाचा उपयोग रात्री झोपताना योग्य प्रमाणात प्रकृतीला अनुसरून केला, तर मलावरोधाचा त्रास कमी होऊ शकेल. दुकानावर कोणीतरी आलाय म्हणून समोसा, वडा या वरचेवर खाण्याच्या गोष्टी टाळाव्यात, तरच गॅसेसचा त्रास टळू शकतो. नाही तर पोट म्हणजे या गॅसेसचे माहेरघर बनून जाते आणि अजीर्णजन्य विकारांना सामोरं जावं लागतं.

चहापान हे या दुकानदारांच्या दिनक्रमात अपरिहार्य स्थान असणार अंग आहे. कारण दिवसभर काही मंडळींचा दुकानावर बसल्या बसल्या अक्षरशः 10-15-20 कप चहा होतो आणि मग त्यामुळे अ‍ॅसिडिटी, अल्सर, डोकेदुखी यांसारख्या अनेक विकारांना तोंड द्यावे लागते. व्यवसायातील संबंध राखण्यासाठी अनेकदा चहा पाजताना स्वतःही मोठ्या प्रमाणावर चहापान ह्या लोकांकडून केले जाते, हे चुकीचे आहे, ते टाळायला हवे. दिवसातून चहा घ्यायचाच झाला, तर दोन कपापेक्षा जास्त नको.

घर आणि दुकान याचं अंतर जास्त असले तर अनेकांना दुपारचा जेवणाचा डबा लागतो. त्या डब्यांमध्ये ताजं अन्न असणं, योग्य तेवढं पातळ (द्रव) अन्न असणं हे आवश्यक असत. कारण कोरडं खाल्ल्यानं मुळातच कमी हालचालीच्या व्यवसायामुळे निर्माण होण्याची शŠयता असणारे पचनाचे विकार अधिकच बळावतात. दुकानात काम करताना सतत बसावं लागणं किंवा सतत उभं राहावं लागणं यामुळे पायांच दुखणं, साधेदुखी निर्माण होण्याची दाट शŠयता असते. म्हणून सकाळी व्यायाम, फिरणं याबरोबरच अंघोळीच्या वेळेस अभ्यंग करणे हेही गरजेचं ठरतं दुकानदारांना आपल्या गिर्‍हाईकांशी सतत बोलावं लागतं. त्यामुळे अनेकवेळा ऊर्जा खूप जाते. अशा वेळी या मंडळींनी आपल्या खाण्यापिण्यात गाईचं दूध, गाईच तूप, खजूर, मनुका, नारळपाणी असे पदार्थ नेहमी ठेवावेत. शतावरी, अश्वगंधा, ज्येष्ठमध यांचे चूर्ण दुधातून सेवन करण्याची सवय ठेवली तर ती अतिशय उपयुक्त ठरते.

दुकानदारांना सतत माल देऊन पैसे घेताना, काही अधिक गोष्टी एकाचवेळी विकताना होणार्‍या बिलांची बेरीज करावी लागते. ही बेरीज करताना शŠयतो कॅल्Šयुलेटर न वापरता जितकी बेरीज शŠय असेल तितकी मनात करण्याचा प्रयत्न ठेवायला हवा. याने बेरीज करण्याची मेंदूची क्षमता टिकून राहते. छोट्याशा बेरेजेसाठीही कॅल्Šयुलेटरची मदत घेणं बुद्धीला परवडणारे नाही, हे पक्के लक्षात ठेवावं. अगदी छोट्या पानपट्टीपासून ते अगदी मोठ्या कापडाच्या व्यापार्‍यापर्यंत थोड्या कमी अधिक पद्धतीनं वरचं वर्णन लागू पडतं. या सगळ्यांनीच आपला दिनक्रम निश्चित करायला हवा. आपले आरोग्य चांगले राहिले तरच पुढे आपण उत्तम व्यवसाय करू शकू, हा विचार मनात सतत ठेवला पाहिजे आणि नियमित दिनक्रमाची जोपासना केली पाहिजे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news