स्पॉन्डिलायटिसने त्रस्त आहात?

स्पॉन्डिलायटिसने त्रस्त आहात?
Published on
Updated on

स्पॉन्डिलायटिस शक्यतो चाळिशीनंतर डोके वर काढण्याची शŠयता असते. पुरुष आणि महिलाही या आजाराला बळी पडतात. जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे युवावस्थेतच स्पॉन्डिलायटिससारखा आजार जडण्याचे प्रमाण वाढले आहे. बसण्याची चुकीची पद्धत, हे या आजाराचे मुख्य कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

संबधित बातम्या 

स्पॉन्डिलायटिस किंवा स्पॉन्डिलोसिस हे अर्थ्राइटिसचेच एक रूप आहे. हा आजार मुख्यत्वे पाठीच्या कण्यावर दुष्परिणाम करतो. कण्याच्या हाडांची असामान्य वाढ आणि मणŠयांमधील कुशनमध्ये (इंटरव्हर्टेबल डिस्क) कॅल्शियमचे डी-जनरेशन, बहिःक्षेपण आणि आपल्या स्थानावरून मणके सरकल्यामुळे स्पॉन्डिलायटिस होतो.

स्पॉन्डिलायटिसचे प्रकार

शरीराच्या वेगवेगळ्या भागांना प्रभावित करण्यावरून स्पॉन्डिलायटिसचे तीन प्रकार मानले जातात.

सर्व्हाइकल स्पॉन्डिलायटिस

सर्व्हाइकलला प्रभावित करणार्‍या मानदुखीला सर्व्हाइकल स्पॉन्डिलायटिस असे म्हणतात. मानेचा खालचा भाग, दोन्ही खांदे, कॉलर बोन आणि खांद्याच्या सांध्यापर्यंत वेदना पोचतात. यामुळे मान वळवायला त्रास होतो. कमजोर स्नायूंमुळे हात हलवायलाही त्रास होतो.

लम्बर स्पॉन्डिलायटिस

या आजारात कमरेच्या बाजूला कण्याच्या खालच्या बाजूला वेदना होतात.

एन्कायलूझिंग स्पॉन्डिलायटिस

या आजारामुळे मुख्यत्वे सांधे प्रभावित होतात. कमरेच्या हाडाव्यतिरिक्त खांदे आणि नितंबांजवळील सांध्यांना या आजारात खूप त्रास होतो. एन्कायलूझिंग स्पॉन्डिलायटिस झाल्यास कणा, गुडघे, नितंब, खांदे, मान आणि जबडा हे अवयव कडक होतात.

अशी आहे समस्या

स्पॉन्डिलायटिस शक्यतो चाळिशीनंतर डोके वर काढण्याची शक्यता असते. पुरुष आणि महिलाही या आजाराला बळी पडतात. जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे युवावस्थेतच स्पॉन्डिलायटिससारखा आजार जडण्याचे प्रमाण वाढले आहे. बसण्याची चुकीची पद्धत हे या आजाराचे मुख्य कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चुकीच्या पद्धतीने उठण्या-बसण्यामुळे वा उभे राहण्यामुळे स्नायूंवर ताण येतो. याखेरीज कॅल्शियमची कमतरता हे दुसरे महत्त्वाचे कारण आहे. ऑर्थोपेडिक रुग्णालयात मोठ्या संख्येने आजकाल स्पॉन्डिलायटिसचे रुग्ण येत आहेत. यामध्ये तीस वर्षांपेक्षा कमी वय असणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे, ही चिंतेची बाब होय. काही वर्षांपूर्वीची रुग्णसंख्या लक्षात घेता आता ती तिपटीने वाढली आहे. आयटी इंडस्ट्री किंवा बीपीओमध्ये काम करणारे युवक किंवा संगणकावर काम करणारे युवक मोठ्या संख्येने स्पॉन्डिलायटिसला बळी पडत आहेत. आपल्या देशात सात व्यक्तींमधील एकजण मानदुखी आणि पाठदुखीने त्रस्त असल्याचा अंदाज काढण्यात आला आहे.

स्पॉन्डिलायटिसची लक्षणे

पाठीचा कणा दबला गेला असेल, तर ब्लॅडर आणि बाऊलवरील नियंत्रण सुटत जाते. या आजाराची लक्षणे हाताच्या बोटांपासून डोŠयापर्यंत सर्वत्र जाणवू शकतात. खांदा, कमरेच्या खालील हिस्सा आणि पायाच्या वरील हिस्सा कमजोर पडून कडक होत जातो. कधी-कधी छातीतही दुखू शकते. व्हर्ब्रेटामधील स्नायूंना सूज येते. मानेपासून खांद्यापर्यंत आणि तेथून वेदना हात, डोŠयाच्या मागील भाग आणि पाठीच्या वरील भागात पोचतात. शिंकताना, खोकताना आणि मानेच्या हालचाली करताना त्रास होऊ लागतो. वेदनेव्यतिरिक्त संवेदनशून्यता आणि अशक्तपणाही जाणवू लागतो. शारीरिक संतुलन बिघडू शकते. मात्र, सर्वांत आधी दिसणारी लक्षणे म्हणजे मानदुखी आणि पाठदुखी, तसेच हे अवयव कडक होणे. दिवसागणिक हे दुखणे वाढत जाते. स्पॉन्डिलायटिसला सुरुवात झाल्यावर आजार केवळ सांध्यांपुरताच मर्यादित राहत नाही. समस्या गंभीर बनल्यास ताप येणे, थकवा, उलट्या होणे, चक्कर येणे आणि भूक मंदावणे अशीही लक्षणे दिसतात.

सामान्य उपचार

स्पॉन्डिलायटिस होण्याची कारणे वेगवेगळी असतात. सांधेदुखीस कारणीभूत ठरणारा स्पॉन्डिलायटिस कधीकधी आनुवंशिकही असू शकतो; परंतु असे फार कमी वेळा पाहायला मिळते.

स्पॉन्डिलायटिसची काही कारणे पुढीलप्रमाणे

आनुवंशिक कारणे, वाढते वय, आहारात पोषकद्रव्ये, कॅल्शियम आणि डी जीवनसत्त्वांची कमतरता आणि त्यामुळे हाडे कमकुवत होत जाणे, बसण्याची आणि उठण्याची चुकीची पद्धत, दीर्घकाळ ड्रायव्हिंग करणे, शारीरिक श्रमांचा अभाव, मसालेदार, थंड आणि शिळे अन्न खाणे, विलासी जीवनशैली, महिलांमधील मासिक पाळीचे वारंवार असंतुलन, वाढत्या वयाबरोबर हाडांचा क्षय सुरू होणे, तसेच कधीकधी फ्रॅŠचर झाल्यानंतर क्षयाची स्थिती निर्माण होणे.

आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा वापर वाढवून या आजारापासून दूर राहणे बर्‍याच अंशी शŠय असते; परंतु त्याबरोबरच आपल्या चालण्याची, बसण्याची, उभे राहण्याची पद्धत कशी आहे, याकडेही लक्ष असायला हवे.

याखेरीज पुढील उपाय योजता येतात

जीवनशैलीत बदल, पौष्टिक भोजन घेणे, विशेषतः कॅल्शियम आणि ड जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचा समावेश करणे, चहा आणि कॉफीचे सेवन कमी करणे, जास्तीत जास्त पायी चालण्याचा प्रयत्न करणे, शारीरिक सक्रियता इ. नियमित व्यायामामुळे आणि योगा केल्याने हे दुखणे दूर ठेवता येते. नेहमी आरामदायी बिछान्यावर झोपावे. हा बिछाना जास्त कडक किंवा जास्त नरम असू नये, याची काळजी घ्यावी. स्पॉन्डिलायटिस जडलेल्या व्यक्तींनी डोŠयाखाली जाडजूड उशी घेऊ नये. तसेच त्यांनी पायांखालीही उशी घ्यायला हवी. कामासाठी टेबल आणि खुर्ची निवडताना जास्त झुकून काम करावे लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. बसताना कंबर ताठ राहील, याची दक्षता घ्यावी.

घरगुती उपचार

सर्व्हाइकल स्पॉन्डिलायटिस वाढत्या वयोमानानुसार मानेचे हाड झिजल्यामुळे उद्भवतो. मानेच्या हाडाची डिस्क पलटणे, लिगामेन्ट फ्रॅक्चरी आदी कारणांमुळेही हा आजार होतो. या आजारात असह्य वेदना होतात. मान खूप जड आणि कडक होते. वेदना खांद्यापासून मानेपर्यंत आणि मानेपासून डोŠयापर्यंत पोचतात. हातांच्या स्नायूंपासून बोटांपर्यंत वेदना जाणवू लागतात. वयाच्या साठीनंतर हा आजार कुणालाही होऊ शकतो. अर्थात, स्वास्थ्यहीन जीवनशैली, बसण्या-उठण्याचा अयोग्य प्रकार आणि आनुवंशिक कारणामुळे तो याहूनही कमी वयात जडू शकतो. यावर पुढील घरगुती उपाय करता येणे शक्य आहे.

नियमित व्यायाम

मानेचे आणि हातांचे व्यायाम नियमितपणे करीत राहिल्यास स्पॉन्डिलायटिसमुळे होणार्‍या वेदना कमी होत जातात. डोŠयाची डावी-उजवीकडे, वर-खाली अशी हालचाल करा. मान डावी-उजवीकडे आणि दोन्ही खांद्यांवर आळीपाळीने झुकवा. हा व्यायाम दिवसातून दोन-तीन वेळा दहा-दहा मिनिटे केल्यास बराच फायदा होतो. हलके अ‍ॅरोबिŠस आणि पोहण्यासारखा व्यायामही अर्धा तास करणे शक्य असते. मानेच्या स्पॉन्डिलायटिसपासून यामुळे आराम मिळेल.

गरम आणि थंड पाण्याच्या पट्ट्या

मानेच्या ज्या प्रभावित भागात अधिक वेदना होतात आणि जो भाग कडक झाला असेल, त्या भागावर आधी गरम आणि नंतर थंड पाण्याच्या पट्ट्या आळीपाळीने ठेवून दाबून धराव्यात. गरम पाण्याच्या पट्टीमुळे रक्ताभिसरण गतिमान होईल आणि वेदना कमी होतील. थंड पाण्याच्या पट्टीमुळे सूज कमी होईल. गरम पाण्याची पट्टी दोन ते तीन मिनिटे तसेच थंड पाण्याची पट्टी एक मिनिट ठेवावी. पंधरा मिनिटांनंतर हीच क्रिया पुन्हा करावी.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news