पीसीओएस आणि लठ्ठपणामुळे महिलांचे मानसिक आरोग्य धोक्यात

पीसीओएस आणि लठ्ठपणामुळे महिलांचे मानसिक आरोग्य धोक्यात
Published on
Updated on

पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) हा एक हार्मोनल विकार आहे, जो प्रजननाच्या वयोगटातील स्त्रियांमध्ये जास्त आढळतो. भारतीय महिलांमध्ये पीसीओएसचे प्रमाण 5 ते 11 टक्क्यांपर्यंत आहे. शहरी महिलांमध्ये विशेषतः प्रजनन वयोगटातील महिलांमध्ये हे अधिक सामान्यपणे आढळून येते. तसेच लठ्ठपणा, टाईप 2 मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांनाही हे कारणीभूत ठरत आहे. यामध्ये अनियमित मासिक पाळी, चेहर्‍यावर पिंपल्स, शरीरावरील अनावश्यक केसांची वाढ (हर्सुटिझम), वंध्यत्व, इन्सुलिन प्रतिरोधकता आणि केस गळणे अशी अनेक लक्षणे दिसतात.

पीसीओएस आणि लठ्ठपणा

असंतुलित संप्रेरक अंडकोषात अंडी तयार होऊ देत नाहीत. झालीच तर अंडकोषातून बाहेर पडायला मज्जाव करतात.
अनेक स्त्रियांसाठी पीसीओएसमुळे वाढलेले वजन कमी करणे हे आव्हानात्मक आणि नैराशात्मक ठरते. पीसीओएसमुळे लठ्ठपणाचा सामना करावा लागतो आणि लठ्ठपणा हा पीसीओएसची लक्षणे वाढवतो. त्यांना अनावश्यक केसांची वाढ, वजन वाढणे इत्यादींना सामोरे जाण्यासाठी त्रास होतो. यासाठी खालील उपाय करावे लागतात.

  • पीसीओएसबाबत समाजाला शिक्षित करणे आणि जागरुकता निर्माण करणे.
  • सोशल मीडिया, वेबसाईटस् आणि शैक्षणिक साहित्याद्वारे पीसीओएसबद्दल योग्य माहितीचा प्रसार करणे.
  • मित्र, कुटुंबीय आणि समवयस्कांमध्ये पीसीओएसबद्दल खुली चर्चा करणे, जनजागृती करणे.
  • हेल्थ केअर क्षेत्रातील प्रत्येकालाच पीसीओएससंबंधी प्रशिक्षित करणे.
  • ज्या महिला मानसिक परिणामाला सामोरे जात असतील त्यांना आधार द्यावा.
  • शरीराच्या आकाराची पर्वा न करता आपल्या शरीराचा स्वीकार करा.
  • पीसीओएस असल्याची शंका असल्यास किंवा लक्षणे जाणवल्यास, त्वरित तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. वजन कमी करणे हा पीसीओएस उपचाराचा अविभाज्य घटक आहे. वजन कमी करण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. स्वतःच्या मर्जीने औषधांचे सेवन टाळावे तसेच झटपट वजन कमी करणारे डाएट, तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय केले जाणारे डाएट टाळावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news