World Milk Day 2023 : गाईच्या दुधाचे 'हे' आहेत आश्चर्यकारक फायदे | पुढारी

World Milk Day 2023 : गाईच्या दुधाचे 'हे' आहेत आश्चर्यकारक फायदे

World Milk Day 2023 : वजन घटवण्यापासून ते चांगल्या झोपेसाठी गायीचे दूध ठरते उपयोगी

सुनीता जोशी

दुधाला पूर्ण अन्न मानले जाते. आयुर्वेदात तर दुधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता पाश्चात्य जगतालाही दुधाचे महत्त्‍व पटू लागले आहे. दुधात अनेक पोषक घटक असतातच शिवाय त्यामुळे शरीराचे वजन घटण्यासही मदत होते, असे इस्रायली शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात आढळून आले आहे.

भारतात तर प्राचीन काळापासून आहारात दुधाचा समावेश करण्यात आला आहे. आयुर्वेदात तर दुधाला विशेषतः गायीच्या दुधाला अतोनात महत्त्व आहे. म्हणून तर गायीला आपल्या संस्कृतीत कामधेनू म्हणतात. आपल्या संस्कृतीत गायीला मातेचे स्थान म्हणूनच दिले आहे.

World Milk Day 2023 : गायीचे दूध सर्वोत्तम का आहे?

गायीचे दूध आणि त्यापासून तयार केलेले तूप हे दोन्ही आरोग्यदायी असते. सर्व दुधांत गायीचे दूध सर्वात पवित्र मानले जाते. तर दुधांच्या आणि दुग्धजन्य पदार्थाच्या तुलनेत गायीचे दूध पचायला हलके असते.

आयुर्वेदानुसार संपूर्ण शरीराच्या वाढीसाठी गायीचे दूध पोषक ठरते. आयुर्वेदात म्हटले आहे की, दूध कच्चे किंवा निरसे घ्यावे. पण ते एकदा तरी उकळून घेतलेले चांगले. कारण दूध उकळल्याने त्यातील अमिनो ॲसिडचे विघटन होते आणि ते
पचायला हलके बनते. गायीचे दूध गर्भवती, स्तनपान करणाऱ्या महिला आणि लहान मुलांसाठी अतिशय आरोग्यदायी असते. चिमूर मिरी, आल्याचे तुकडे आणि दालचिनी टाकून दूध उकळले तर त्यामुळे शरीराचा जडपणा कमी होतो. आणि सर्दी कमी होते. गायीच्या दुधात जीवनसत्व ए, बी २, बी३, कॅल्शियम आणि प्रोटीन असते. त्याची शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

Milk Day 2023 : आम्लपित्त कमी करण्यात दुधाचा फायदा

आम्लपित्त कमी करण्यास याचा उपयोग होतो. साहजिकच पेप्टिक अल्सर होण्याची संभावनाही कमी असते. गायीच्या दुधापासून तयार केलेले दही जर गर्भवती महिलांनी खाल्ले तर गर्भपात, दिवस भरण्याआधीच प्रसूती होणे आणि इतर गुंतागुंत येते. चांगली झोप घ्यायची असेल तर गायीचे गरम दूध पिणे चांगले.

आयुर्वेदाने थंड दूध पिणे अहितकारक असल्याचे सांगितले आहे. कारण यामुळे शरीरातील अग्रीचे शमन होते आणि त्यामुळे त्यातील पोषक घटक निष्प्रभ ठरतात. यामुळे सर्दी होण्याचा संभव असतो.

गायीचे तूप अतिशय गुणकारी असते. त्याची चव आणि पोषक घटक यामुळे कोणत्याही इतर खाद्यतेलाच्या तुलनेत ते कमी म्हणजे जवळजवळ निम्मे पुरेसे होते. यात ऑक्सीडाइज्ड कोलेस्टॉल किंवा ट्रान्सफॅटी आम्ल नसते. आयुर्वेदात तूप हे स्वयंपाकाचे सर्वोत्तम आणि अंतिम माध्यम मानले. गेले आहे. तुपाचे आपल्या शरीराला शरीराची एकूण ताकद, सौंदर्य वाढवण्यासाठी तुपाचा उपयोग होतो. भाजल्याच्या जखमेवर तूप औषध म्हणून उपचार करते. तुपाचे अनेक फायदे आहेत. तरीही आहारात त्याचा वापर बेतानेच कारावा.  सर्वसाधारणपणे दोन वेळा चमचाभर तूप पुरेसे ठरते.

दुधाचा फायदा वजन कमी करण्यासाठी

अलीकडेच इस्रायलमध्ये झालेल्या एका संशोधनात आढळून आले आहे की, नियमितपणे दूध पिल्यास वजन घटते.
दुधाच्या पदार्थापासून ज्यांना ॲलर्जी असते, त्यांच्यासाठीही तूप गुणकारी ठरते. तरीही आहारात त्याचा वापर बेतानेच करावा. सर्वसाधारणपणे दिवसातून दोन वेळा चमचाभर तूप पुरेसे ठरते. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रीशियन या मासिकात हे संशोधन प्रकाशित झाले आहे. इस्रायलमधील नेगेव येथील बेन गुरीयन विद्यापीठात झालेल्‍या  संशोधनात जी प्रौढ माणसे दिवसातून दोनवेळा दोन ग्लास दूध पितात, त्यांचे वजन दूध किंवा दुधाचे पदार्थ आजिबात खात नाहीत किंवा कमी खातात त्यांच्य तुलनेत दोन वर्षांच्या कालावधीत जास्त घटलेले आढळले आहे.

(१ जून हा जागतिक दूध दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने हा विशेष लेख. पूर्वप्रसिद्धी दैनिक पुढारी.)

हेही वाचा : 

Back to top button