झोपेच्या सवयींमुळे समजते तुमची तंदुरुस्ती, जाणून घ्‍या सविस्‍तर | पुढारी

झोपेच्या सवयींमुळे समजते तुमची तंदुरुस्ती, जाणून घ्‍या सविस्‍तर

तंदुरुस्त राहाण्यासाठी पुरेशी झोप घेणे जसे महत्त्वाचे तसेच योग्य स्थितीत झोपणे हे देखील महत्त्वाचे आहे. वाईट प्रतीची झोप वेदनांचे कारण होतेच; पण त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही असतो. पण, झोपण्याच्या सवयींमुळे अनेक गोष्टी स्पष्ट होतात. ( Sleep difficulties ) झोपेच्या सवयींमुळे आपण किती तंदुरुस्त आहोत हे समजते.

Sleep difficulties : सातत्याने लघवीला जाणे 

रात्री सतत लघवी येणे हे मधुमेहाचे लक्षण असू शकते. रात्रभरात 2 वेळा लघवी करण्यासाठी जात असाल तर तपासणी करावी कारण ही लक्षणे प्री डायबेटिसची असू शकतात. जेव्हा रक्तामध्ये साखरेचे प्रमाण वाढते तेव्हा शरीर लघवी वाटे ते बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते.

अचानक झोप मोडणे 

रात्री गाढ झोपलेले असताना अचानक झटके येतात. काही वेळा आपण स्वप्न पाहात असतो. काही वेळा आपण अचानक ओरडू लागतो. या अवस्थेला हायपेनिक जर्क म्हणतात. संशोधनानुसार जगभरात 70 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी ही अवस्था अनुभवली आहे.

Sleep difficulties : श्वास घेण्यास त्रास 

स्लीप अ‍ॅप्निया या विकारामुळे झोपताना श्वास घेण्यास त्रास होतो. हल्ली हा विकार होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे बिघडलेली दिनचर्या.

सतत कूस बदलणे आणि ठोके वेगाने पडणे

रात्री झोपताना सतत कूस बदलत असाल किंवा हृदयाचे ठोके वेगाने पडत असतील तर ते ओव्हर अ‍ॅक्टिव्ह थायरॉईडमुळे होऊ शकते. असे अनुभवास येत असेल तर डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी

झोपेत हलू न शकणे 

स्लीप पॅरालिसिस ही एक अशी अवस्था आहे जेव्हा कोणीही झोपेतून जागे झाल्यावर शरीर हलवू शकत नाही आणि संपूर्ण शरीर लकवाग्रस्त झाले असल्यासारखे वाटते. शरीराचा कोणताही अवयव हलवू शकत नाही, असे वाटते. ज्या व्यक्तींना निद्रा रोग किंवा नार्कोलेप्सी हा विकार असतो त्या व्यक्तींना बहुतेकवेळा हा त्रास होतो. झोपेशी संबंधित या समस्येमध्ये झोपताना किंवा जागताना स्नायू निष्क्रिय होत असल्याचा अनुभव येतो.

 डॉ. प्राजक्ता पाटील 

हेही वाचा : 

Back to top button