

पुढारी ऑनलाईन डेस्क : वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर नॉन-शुगर स्वीटनर (NSS) पासून लांब राहणे गरजेचे आहे, कारण यामुळे वजन कमी हाेण्यास मदत हाेत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने ( डब्ल्यूएचओ ) म्हटलं आहे. जाणून घेवूया Non-sugar sweeteners संदर्भातील 'डब्ल्यूएचओ'च्या नव्याने जारी केलेल्या नवीन आरोग्य मार्गदर्शक तत्वांविषयी…
लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार हे आधुनिक जीवनशैलीमुळे होतात. तसेच अयोग्य आहारही याला कारणीभूत ठरतो. त्यामुळेच अनेक संशोधनाअंती साखर, शुद्ध साखर किंवा पांढरी साखर हानिकारक पदार्थांपैकी एक मानला जातो. निरोगी आयुष्य हवे असेल तर सुरुवातीपासूनच आहारातील गोड पदार्थ कमी करावेत, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
आराेग्य विषयक नवीन मार्गदर्शक तत्त्वे ही आहाराची गुणवत्ता सुधारणे आणि असंसर्गजन्य आजारांचा धोका कमी करणे, या हेतूने तयार केलेली आहेत, असेही जागतिक आरोग्य संघटनेने ( डब्ल्यूएचओ ) स्पष्ट केले आहे. वजन कमी करण्यासाठी व्यक्ती आपल्या आहारातून साखर हद्दपार करण्याचा प्रयत्न करते. मात्र साखर पूर्ण बंद करताना नॉन-शुगर स्वीटनर (NSS)चा आहारात समावेश करतात. मात्र अशा नॉन-शुगर स्वीटनरमुळे वजन कमी होण्यास मदत होत नाही, असे 'डब्ल्यूएचओ'ने म्हटले आहे.
नॉन-शुगर स्वीटनरमध्ये एसेसल्फेम के, एस्पार्टेम, ॲडव्हान्टेम, सायक्लेमेट्स, निओटेम, सॅकरिन, सुक्रालोज, स्टीव्हिया आणि स्टीव्हिया डेरिव्हेटिव्ह्ज आदींचा समावेश असतो. त्यामुळे प्रौढ आणि मुलांमधील शरीरातील चरबी कमी करण्यासाठी नॉन-शुगर स्वीटनरचा (NSS) दीर्घकालीन लाभ होत नाही. लोकांना साखरेचे सेवन कमी करण्यासाठी इतर मार्गांचा विचार करणे आवश्यक आहे. यामध्ये फळे किंवा गोड न केलेले अन्न आणि पेये यांचा समावेश हाेताे, असे 'डब्ल्यूएचओ'च्या पोषण आणि अन्न सुरक्षा संचालक फ्रान्सिस्को ब्रँका यांनी स्पष्ट केले आहे.
नॉन-शुगर स्वीटनरमध्ये पूर्व-पॅकेज केलेले पदार्थ आणि पेयांमध्ये साखरेला पर्याय म्हणून वापरल्या जाणार्या सर्व सिंथेटिक स्वीटनर्सचा समावेश आहे. नॉन-शुगर स्वीटनर हे आहारातील आवश्यक घटक नाहीत. त्यामध्ये कोणतेही पौष्टिक मूल्य नाही. लोकांनी त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सुरुवातीपासूनच आहारातील गोडवा नियंत्रणात ठेवला पाहिजे, असेही डब्ल्यूएचओ आपल्या आरोग्य मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटले आहे.
नॉन-शुगर स्वीटनर पदार्थांचे जास्त सेवन हे लठ्ठपणाशी जोडले गेले आहे. जगभरातील प्रौढ लोकसंख्येसह लाखो लहान मुलांवर याचा परिणाम होऊ शकतो. असं असलं तरी, टूथपेस्ट, स्किन क्रीम आणि औषधे किंवा कमी-कॅलरी/ साखर असणाराने अल्कोहोल (पॉलिओल) या उत्पादनांना ही शिफारस लागू होत नाही, असे WHO ने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा :