रात्रीची झोप मुलांसाठी खूपच महत्त्‍वाची, जाणून घ्‍या नवीन संशोधन काय सांगते… | पुढारी

रात्रीची झोप मुलांसाठी खूपच महत्त्‍वाची, जाणून घ्‍या नवीन संशोधन काय सांगते...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : वयोगट कोणताही असो झोप ही निरोगी आरोग्‍याचा पाया आहे. मुलांच्‍या आरोग्‍यासाठी रात्रीची शांत झोप ही खूपच महत्त्‍वपूर्ण ठरते. मुलांनी दररोज किमान ९ ते १० तास झोप घेणे आवश्‍यक असल्‍याचे अनेक संशोधनात स्‍पष्‍ट झाले आहे. (kids sleep ) आधुनिक जीवनशैलीत मुलांची झोप कमी होत असल्‍याचे चित्र सर्वत्र दिसते. झोप कमी झाल्‍यास मुलांची  शारीरिक व मानसिक आरोग्‍यावर कोणते परिणाम होतात यावर नुकतेच एक संशोधन झाले. ‘जामा नेटवर्क ओपन ट्रस्‍टेड सोर्स’मध्‍ये प्रकाशित झालेल्‍या या नवीन संशोधनाविषयी जाणून घेवूया …

kids sleep : असे झाले संशोधन ?

मुलांच्‍या शारीरिक व मानसिक वाढीवर झोपेचा नेमका कोणता परिणाम होतो ? या प्रश्‍नावर संशोधकांनी अभ्‍यास केला. २०२२ म्‍हणजे मागील वर्षी झालेल्‍या या संशोधनात ८ ते १२ वयोगटातील झोपेची कोणतीही समस्‍या नसलेल्‍या १०० निरोगी मुलांनी भाग घेतला होता. संशोधनात सहभागी झालेल्‍या सर्व मुलांची एक आठवड्यासाठी नेहमी झोपत असलेली वेळ एक तासांनी वाढवली. म्‍हणजे झोपेचा कालावधीत एक तास ते ३९ मिनिटांनी कमी केला. याचा शरीर आणि मनावर कसा परिणाम झाला ? याची माहिती घेण्‍यासाठी प्रश्‍नावलीच्‍या माध्‍यमातून माहिती घेण्‍यात आली.

झोपेचा कालावधी कमी झाल्‍यास शारीरिक व मानसिक दुष्‍परिणाम

या संशोधनात नेमकं काय आढळले याविषयी अमेरिकेतील ह्यूस्टन येथील झोप विकार तज्ज्ञ आणि पल्मोनोलॉजिस्ट डॉ. फिलिप पिर्टल यांनी संगितले की, मुलांच्‍या झोपेविषयीच्‍या अभ्‍यासामध्‍ये एक आठवडयासाठी मुलांचा झोपेचा कालावधी कमी करण्‍यात आला. यानंतर तत्‍काळ याचा परिणाम त्‍यांच्‍या शारीरिक व मानसिक आरोग्‍यावर नकारात्‍मक झाल्‍याचे दिसले.

मुलांसाठी पोषक आहाराबरोबर झोपही महत्त्‍वाची…

संशोधनातील निष्‍कर्षाबाबत मियामी हेल्‍थ सिस्‍टीम विद्यापीठातील सहयोगी संचालक डॉ. अजीज सेक्‍सास यांनी सांगितले की, “या नवीन अभ्यासाने निरोगी मुलांमधील झोपेचे निर्बंध आणि आरोग्य-संबंधित जीवनमान यांचा थेट संबंध दर्शविला आहे.या संशोधनातील निष्‍कर्षाची सर्वच पालकांनी गांभीर्याने नोंद घेणे गरजेचे आहे. मुलांसाठी झोप ही अत्‍यंत महत्त्‍वाची
गोष्‍ट आहे. मुलांना पोषक आहार ते व्‍यायाय तसेच त्‍यांचे सामाजिक जीवन या सर्व घटकांवर झोपेचा सकारात्‍मक किंवा नकारात्‍मक परिणाम होऊ शकतो. ”

kids sleep : पालकांनी झोपी जाण्‍याच्‍या वेळा पाळणे आवश्‍यक

नियमित वेळेत पुरेशी झोप घेणे आणि यामध्‍ये सातत्‍य ठेवणे हे सर्वांसाठीच खूपच आवश्‍यक आहे. मुलांनी रात्री जागरण केले तर याचा परिणाम तत्‍काळ त्‍यांच्‍या दुसर्‍या दिवशीच दिसतो. कमी झोप झाल्‍यामुळे मुलांचा मूड बदलतो. एकाग्रता साधण्‍यात त्‍यांना त्रास होतो. रात्री मुलांचे जागरण हे मुलांच्‍या दुसर्‍या दिवसांच्‍या गुणवत्तेवर परिणाम करणारे ठरते. त्‍यामुळे उद्‍या सुटी आहे म्‍हणून आज मुलांनी जागरण केले तरी चालते या मानसिकतेतून पालकांनी बाहेर येणे आवश्‍यक आहे. मुलांबरोबर पालकांनीही आपल्‍या झोपेच्‍या नियमितवेळा पाळणे अत्‍यावश्‍यक आहे. नियमित आणि दररोज पुरेशी झोप झाली तरच मुले ही शारीरिक व मानसिक दृष्‍ट्या सक्षम होतात त्र पालकांनी मुलांचे झोपेचे गणित पाळले नाही तर त्‍यांना शारीरिक व मानसिक दृष्‍ट्या मोठी किंमत चुकवावी लागते, असा इशारा हे नवे संशोधन देते, असेही डॉ. सेक्‍सास यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button