आपल्या पंचज्ञानेंद्रियांपैकी एक श्रवणेंंद्रिय ज्याद्वारे ऐकण्याची क्रिया केली जाते. वारंवार कान दुखणे, कानांतून स्राव येणे, सतत कानांत खाजवणे आणि घरीच कानात काहीबाही घालून मळ काढणे. यामुळे कानांचे आरोग्य धोक्यात येते.
कानामध्ये यूस्टेएशियन वाहिनी असते जी नाक आणि घसा यांना जोडते. या वाहिनीमध्ये नाकातील द्रव्याचे प्रेशर तयार होते. त्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरसचे इन्फेक्शन होते. काही लोक घरच्याघरी उपाय करतात, जसे, कानांत तेल सोडणे वा घरगुती इतर औषधी सोडणे. कानांत गरम तेल सोडल्याने कानाचा नाजूक पातळ पडदा फाटू शकतो. याकारणाने कानांचे आरोग्य धोक्यात येवू शकते.
कानाचा पडदा फाटल्याने इन्फेक्शन वाढून परिणाम कर्णबधिरता येऊ शकते. कानातील सिबेसीअस आणि सेरूमिनस ग्रंथीद्वारे कानातील मळ म्हणजेच वॅक्स तयार होते. त्यामुळे कानांचे संरक्षण होत असते.
या मळामुळे कानांत पाणी जाणे, लहान कीटक, थंड हवा, मोठे असह्य आवाज यांपासून संरक्षण करते. परंतु, सततच्या एअरबडच्या वापराने वॅक्स निघून जाऊन जंतू संसर्ग वाढतो. जेव्हा कानातील मळ त्रासदायक वाटू लागेल तेव्हा डॉक्टरांकडे जाऊन कान तपासणी करून घ्यावी.
कानातून पाण्यासारखा वा पूयुक्त स्राव स्रवणे. कानांत जडपणा वाटणे.
कान दुखणे.
तात्पुरता बहिरेपणा येणे.
कानाच्या बाह्यभागात खाजवणे, सूज येणे. कान दुखणे. डोके दुखणे. कानाला इजा होणे.
आयुर्वेदात सांगितलेले कर्णनाद, कर्णश्वेड या आजारामध्ये रोग्याला सतत कसलेतरी आवाज ऐकू येत राहतात. यावर वेळीच उपचार करावेत. नाहीतर यामुळे मानसिक आजार संभवतो.
* वारंवार सर्दी होणे
* खोकला, घसा दुखणे
* अंघोळीच्यावेळी वा पोहताना कानांत गेलेले पाणी व्यवस्थित साफ न करणे
* थंड हवेत सतत वावरणे
* दात दुखणे वा इतर दातांचे आजार
* इअरफोनचा अतिवापर
* कानात सतत कापूस घालणे
* अपघाताने कानाला मार लागणे.