Diet for diabetics: मधुमेहींसाठी ‘हा’ आहार आहे लाभदायक | पुढारी

Diet for diabetics: मधुमेहींसाठी ‘हा’ आहार आहे लाभदायक

पुढारी ऑनलाईन: मधुमेह हा असा आजार आहे, ज्यामध्ये स्वादुपिंडातून इन्सुलिनचे उत्पादन कमी होते. इन्सुलिन हे असे संप्रेरक आहे जे रक्तातील शर्करेचे रूपांतर ऊर्जेत करीत असते. त्यामुळे ही शर्करा रक्तात साठून राहत नाही व शरीराला पुरेशी ऊर्जाही मिळते. इन्सुलिनमुळेच रक्तातील या साखरेची पातळी नियंत्रित होत असते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहारात असे अन्न घेणे गरजेचे असते ज्यामुळे रक्तातील साखर वाढणार नाही व शरीरात नैसर्गिक इन्सुलिन बनून शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल. अशाच काही खाद्यपदार्थांची माहिती तज्ज्ञांनी दिलेली आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळी नाश्त्यावेळी (Diet for diabetics) हे पदार्थ खाल्ले तर त्याचा त्यांना लाभ मिळू शकतो.

अंडी

‘हेल्थलाईन’च्या माहितीनुसार मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी नाश्त्यात अंडी लाभदायक ठरू शकतात. याचे कारण त्यामधून 70 कॅलरीज आणि 6 ग्रॅम प्रथिने मिळतात. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णाची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. अंडी हा प्रोटिन्स म्हणजेच प्रथिनांनी समृद्ध आहार (Diet for diabetics) मानला जातो.

दलिया

वेगवेगळे धान्य भरडून ते अनेक पद्धतीने खाल्ले जाते. असा ‘दलिया’ विशेषतः ओटस्च्या जाड्याभरड्या पीठाचा असेल तर तो मधुमेहाच्या रुग्णांना अधिक लाभदायक ठरतो. यामध्ये भरपूर कॅलरीज, प्रथिने व फायबरही असते. मधुमेहाच्या रुग्णांची साखरेची पातळी नियंत्रित (Diet for diabetics) करण्यासाठी हा नाश्ता उपयुक्त ठरतो.

अ‍ॅव्होकॅडो

हल्ली हे फळ सर्वत्र उपलब्ध होऊ लागले आहे. ते आरोग्यासाठी अतिशय लाभदायक मानले जाते. ते स्वादिष्ट तर असतेच शिवाय रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठीही उपयुक्त आहे. त्यामध्ये कॅलरीज, प्रथिने, मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड आणि फायबर्सही असतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात हे फळ असावे.

पनीर

मधुमेहाच्या रुग्णांसाठी पनीर व सर्व दुग्धजन्य पदार्थ नाश्त्यात असणे लाभदायक ठरू शकते. यामध्ये कमी कार्बोहायड्रेटस् असतात तसेच प्रथिने व फायबर चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे इन्शुलिन वाढीस मदत होते.

टोफू

सोयामिल्कपासून बनवलेल्या टोफूमध्ये कार्बोहायड्रेटस् आणि असंतृप्त चरबी कमी प्रमाणात असते. टोफू मल्टिग्रेन टोस्ट किंवा भाज्यांमध्ये मिसळून नाश्त्यामध्ये खाल्ल्यास Diet for diabetics:च्या रुग्णांना लाभ मिळू शकतो.

हेही वाचा:

Back to top button