Benefits of Sunlight : सका‍ळी सूर्यप्रकाशात ३० मिनिटे व्यतित करणे पुरुषांच्‍या लैंगिक आरोग्‍यासाठी ठरते फायदेशीर | पुढारी

Benefits of Sunlight : सका‍ळी सूर्यप्रकाशात ३० मिनिटे व्यतित करणे पुरुषांच्‍या लैंगिक आरोग्‍यासाठी ठरते फायदेशीर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आठवड्यातून दोन ते तीन दिवस सका‍ळी सूर्यप्रकाशात ( Benefits of Sunlight ) २० ते ३० मिनिटे  व्यतित केल्याने  पुरुषांचे लैंगिक आरोग्‍य सुधारण्‍यास मदत होते, असे नवीन संशोधनात नमूद करण्‍यात आले आहे. यासंदर्भातील संशोधन सेल रिपोर्ट्‍स जर्नलमध्‍ये प्रकाशित झाले आहे.

सेल रिपोर्ट्‍स जनर्लमधील प्रकाशित लेखात नमूद केले आहे की,” जे पुरुष २० ते ३० मिनिटे सूर्यप्रकाशात वाचन, चालणे, बागकाम अशी सामान्‍य कामे करतात त्‍यांच्‍या टेस्‍टोस्‍टेरॉन हार्मोनच्‍या ( पुरूषाच्या लैंगिक संप्रेरक ) पातळीत वाढ होवू शकते. जे पुरुष आठवड्यातील दोन ते तीन दिवस सुमारे २० ते ३० मिनिटे सूर्यप्रकाशाच्‍या संपर्कात येतात त्यांच्यात ‘टेस्टोस्टेरॉन’ची पातळी जास्त असते. सूर्यप्रकाशातील अल्ट्राव्हायोलेट बी हार्मोनमध्ये रूपांतरित करण्यात त्वचेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.”

या संशोधनाबाबत प्रोफेसर अँड्र्यू ह्युबरमन यांनी इंस्‍टाग्रामवर लिहिलं आहे की, “त्‍वचा ही हार्मोन पातळीला प्रोत्साहन देणारा अवयव म्हणून काम करते. त्वचेच्या पेशींमध्ये p53 जनुक नावाचे विशिष्ट प्रोटीन असते जे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना पिट्यूटरी ग्रंथी आणि हायपोथालेमस सक्रिय करते. त्‍यामुळे ल्युटीनिझिंग हार्मोन/फोलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनमध्ये वाढ होते ज्यामुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते.”

Benefits of Sunlight : व्हिटॅमिन डीची कमी पातळी ‘टेस्टोस्टेरॉन’शी संबंधित

तसेच जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्रिनोलॉजी अँड मेटाबॉलिझममध्ये प्रकाशित झालेल्या २०१९ च्‍या अभ्‍यास म्‍हटले होते की, “पुरुषांच्‍या शरीरात व्हिटॅमिन डीची कमी पातळी कमी ही एकूण टेस्टोस्टेरॉन पातळीशी संबंधित आहे. व्हिटॅमिन डी एकूण टेस्टोस्टेरॉनला मोफत टेस्टोस्टेरॉनमध्ये रूपांतरित करण्यात मदत करेल असे मानले जाते, जे तुमच्या शरीराद्वारे वापरण्यासाठी सहज उपलब्ध आहे.”

हेही वाचा : 

Back to top button