Medicine : सावधान! औषधे खाण्याआधी ‘ही’ लाल रेष पाहिली का ? जाणून घ्या Rx विषयी… | पुढारी

Medicine : सावधान! औषधे खाण्याआधी 'ही' लाल रेष पाहिली का ? जाणून घ्या Rx विषयी...

पुढारी ऑनलाईन डेस्क : शारीरिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे, बहुतेक लोकांना औषधे (Medicine) खावी लागतात. अनेकवेळा असे घडते की काहीजण डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे घेतात. काहीवेळा कोणाच्या तरी सल्ल्याने खात्री न करता औषधे घेतात. कधी कधी असंही होतं की, एखाद्या व्यक्तीला केमिस्टकडे गेल्यानंतर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधे देण्यास नकार दिला जातो. बऱ्याचदा आरोग्याशी खेळू नका असा सल्ला डॉक्टर नेहमीच देत असतात. आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे औषध घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य राहील.

लाल रेष आणि Rx चा अर्थ काय आहे? (Medicine)

तुम्ही एखादे औषध खरेदी करता तेव्हा त्यावर अनेक प्रकारची चिन्हे असतात. या चिन्हांना खूप महत्त्वाचे अर्थ आहेत. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. औषधे आणि सौंदर्य प्रसाधने नियम १९४५ नुसार, जर एखाद्या औषधावर Rx किंवा लाल रंगाची रेष असेल तर ते डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकता येत नाही. NRx, XRx असे काही शब्द औषधांच्या पाकीटांवर असतात. त्या पाहूनच औषधे घेणे फायदेकारक राहील.

NRx म्हणजे काय? (Medicine)

जर एखाद्या औषधावर NRx लिहिले असेल तर त्याचा अर्थ असा होतो की त्यामध्ये अंमली पदार्थांचे प्रमाण आहे. हे अमली पदार्थ किती प्रमाणात घ्यायला हवे याचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे त्याच्या विक्रीसाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आवश्यक असते. अंमली पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा नियम आहे. NRx औषधाचा उपयोग चिंता, नैराश्याशी संबंधित आजारांमध्ये केला जातो. अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (NDPS) कायदा १९८५ मध्ये लागू करण्यात आला. या कायद्याच्या मदतीने अंमली पदार्थ असलेल्या औषधांची विक्री, खरेदी, साठा आणि वापर यावर नियंत्रण ठेवले जाते.

XRx चा अर्थ काय?

जर एखाद्या औषधावर XRx लिहिलेले असेल तर ते औषध किरकोळ विक्रीसाठी ठेवले जात नाही. कारण हे मानसिक विकारांशी संबंधित औषधांवर XRx असे लिहिलेले असते. हे औषध फक्त त्या डॉक्टरांकडे उपलब्ध आहे, ज्यांच्याकडे संबंधित परवाना आहे. डॉक्टरांनी लिहून दिलेली प्रिस्क्रिप्शन असूनही रुग्णांना मेडिकल स्टोअरमधून ही औषधे खरेदी करता येत नाहीत.

हेही वाचा

Back to top button