तुम्ही बायकोला का घाबरता? यामागेही आहे शास्त्रीय कारण – Lifestyle – Heterosexual Men’s Fears in Intimate Relationships

तुम्ही बायकोला का घाबरता? यामागेही आहे शास्त्रीय कारण – Lifestyle – Heterosexual Men’s Fears in Intimate Relationships

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मित्रांनी पार्टी ठेवली असेल तर बायकोला विचारल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही. गर्लफ्रेंडने सांगितलेले एखादे काम टाळण्याची तुमची टाप नसते. बायकोने डोळे वटारून पाहिले तर तुम्ही मांजर होऊन जाता. थोडक्यात काय, मान्य करा अथवा करू नका तुम्ही बायको की गर्लफ्रेंडला घाबरत असता. किती जरी नाही म्हटले तरी हे सत्य आहे. (Heterosexual Men's Fears in Intimate Relationships) थोडे किचकट करून सांगायचे तर विरुद्ध लैंगिक भाव असणारे पुरुष हे त्यांच्या लैंगिक जोडीदाराला घाबरतात; पण या वैश्विक सत्यामागे काही मानसिक कारण असेल का? याचे उत्तर देण्याचा प्रयत्न अव्हरम विस या मानसोपचार तज्ज्ञाने केला आहे.

Psychology Today ही मनोविज्ञानावरील चांगली वेबसाईट आहे. या वेबसाईटवर Why Men Are Intimidated by Their Intimate Partners हा लेख उपलब्ध आहे. अव्हरम विस यांनी हा लेख लिहिला आहे. ते जॉर्जिय विद्यापीठातील मानसशास्त्र विभागात प्राध्यापक आहेत. Hidden in Plain Sight : How Men's Fears of Women Shape Their Intimate Relationships हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. या वेबसाईटवरील हा लेख या पुस्तकातून घेण्यात आला आहे. (Heterosexual Men's Fears in Intimate Relationships)

अव्हरम विस या लेखात म्हणतात, "लहानपणी आपली मानसिकता आई खुश नसेल तर कुणीच खुश नाही अशी असते. आपण जेव्हा प्रौढ होतो तेव्हा आनंदी बायको, आनंदी जीवन हे ब्रीद बनते." विरुद्ध लैंगिक भाव असणारे पुरुष त्यांच्या लैंगिक नातेसंबंधाबद्दल भीतीत जगत असतात. ती महिला आपल्यावर वर्चस्व गाजवेल का, ती महिला आपल्याल फसवेल का, महिलेला आपण सुरक्षित ठेवण्यात अपयशी ठरू का, त्या महिलेसाठी आपण अपुरे पडू का, ती महिला आपल्याला सोडून जाईल का, अशा विविध प्रकारच्या भीतीमध्ये हे पुरुष असतात; पण भीतीची ही भावना पुरुष लपवून ठेवतात.

भीतीचा भावना लपवून ठेवण्यात हे पुरुष इतके माहिर असतात की, ते किती भीतीच्‍या छायेत आहेत, हे त्यांचा आईला आणि प्रेयसीलाही समजू शकत नाही. पुरुष कधी घाबरत नाहीत, हे त्यांना लहानपणापासूनच शिकवलेले असल्‍याने पुरुषांची वर्तणूक अशी असते. जर स्त्रीला हे समजले तर ती आपल्याकडे कमी आकर्षित होईल किंवा ती आपला फायदा घेईल, असे पुरुषांच्या मनात असते. हे इतके नैसर्गिक असते की पुरुषही याबद्दल अनभिज्ञ असतात.

इतिहास आणि संस्कृती

अव्हरम विस म्हणतात, "संपूर्ण इतिहासात पुरुषांना महिलांबद्दल जे रहस्यमय आहे, त्याबद्दल भीती वाटत आली आहे. त्यामुळे अनेक संस्कृतींमध्ये मासिकपाळी, गरोदरपण, प्रसूती निषिद्ध मानले आहे. ज्या महिला यातून जात आहेत त्या धोकादायक मानल्या गेल्या आहेत.

अशा महिलांच्या संपर्कात आलेले पुरुष अशक्त बनतात, असा समज असल्याने अशा स्थितीतील महिलांना समजापासून विलग केले जाते." बऱ्याचश्या संस्कृतीमध्ये योनीला दात असल्याची चित्रे आणि दंतकथा आहेत. शरीरसंबंध ठेवल्याने शक्तीपात होईल, असे या संस्कृतींमध्ये मानले गेले आहे. युद्धाला जाण्यापूर्वी महिलेशी संबंध येऊ नये, अशी प्रथा औद्योगिक क्रांतीपूर्वी होती. आताही अनेक खेळाडू स्पर्धेपूर्वी शरीरसंबंध ठेवले तर शक्ती कमी होईल, असे मानतात.

सार्वजनिक जीवनात महिलेबद्दलची असणारी भीती लपवून ठेवण्यात पुरुष जास्त यशस्वी होतात. पण खासगी आयुष्यात बऱ्याच वेळा हा अभिनवेश गळून पडतो. खासगी आयुष्यात आपली पार्टनर ही अधिक खुलेपणाने वागते. त्यामुळे पुरुषांचे सार्वजनिक जीवनातील वागणे आणि घरातील वागणे यात फार मोठा फरक असतो.

ज्या महिलांना जादा अधिकार असतात, ज्या महिला अधिक सक्षम, आत्मविश्वास असणार्‍या महिलांसमोर पुरुषांची भीतीची भावना जास्त उघड होते. म्हणून कामाच्या ठिकाणी सक्षम महिलांचा बऱ्याच वेळा पुरुष मंडळी तिरस्कार करतात असे दिसून आले आहे, असेही विस यांनी म्‍हटले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news