सतत गोड खाण्याची इच्छा? असू शकतो ‘हा’ मानसिक आजार, डॉक्टरना भेटाच!

सतत गोड खाण्याची इच्छा? असू शकतो ‘हा’ मानसिक आजार, डॉक्टरना भेटाच!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन – कधी तर चॉकलेट खाणे, आईस्किमचा कप फस्त करणे, मिठाईचा तुकडा तोंडात टाकणे, यात काही चुकीचे नाही; पण गोड खाण्याची इच्छा सतत होत असेल तर? दर अर्ध्या तासाला चहा घेण्याची इच्छा होत असेल तर? समजा तुम्हाला सारखेच गोड खावे असे वाटत असेल, तर तुम्हाला मानसिक आजार असू शकतो. एक तर तुम्हाला डिप्रिशेन (उदासीनता) किंवा अस्वस्थता यापैकी एखादा आजार झालेला असण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी मानसोपचार तज्ज्ञाचे मार्गदर्शन घेणे आवश्यक असते. सतत गोड खाण्याची इच्छा होणे आपल्याला अशा आजारांबदद्ल एक प्रकारे इशाराच देत असते. (Depression led sugar craving)

जेव्हा आपण जास्त प्रमाणात साखर खातो त्यामुळे डोपामाईन या हर्मोनची निर्मिती वाढते. डोपामाईनला फील गुड हार्मोन म्हटलं जाते. साखरेमुळे आपल्या उदासीन भावनेवर जय मिळवण्यासाठी लागणारी एक तातडीची किक मिळते; पण ती जास्त वेळ राहात नाही, आणि आपल्याला परत गोड खावे असे वाटते. Naturally Yours या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार जर सिरोटोनिन या हार्मोनची कमतरता असेल तर डिप्रेशनचा (उदासीनता) त्रास सुरू होतो. जर जास्त कार्बोहायड्रेट खाल्ले तर सिरोटोनिनचे प्रमाण वाढते. म्हणजेच शरीरात सिरोटोनिन कमी झाले असेल तर शरीराची मागणी कार्बोहायड्रेटची असते.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसनवर उपलब्ध एका रिसर्च पेपरमध्ये उदासनीतेमुळे माणसांत गोड खाण्याची इच्छा वाढते, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. जास्त गोड पदार्थ खाल्ल्यामुळेही उदासीनतेचा त्रास सुरू होतो, असे तज्ज्ञांनी म्हटलेले आहे. म्हणजेच काय तर सतत गोड खावे असे वाटत असेल तर ते चांगले लक्षण नाही. उदासीनता म्हणजे डिप्रेशन या मानसिक आजारांमुळे अनेक लोक त्रस्त आहेत. तुमचे शरीर गोड पदार्थ सतत मागत आहे, याचा अर्थ ते काही मानसिक आजारांकडे इशारा करत आहे, हे समजून त्यावर योग्य ते उपचार करणे आवश्यक असते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news