

First Aid for Heart Attack: ह्रदयासंदर्भातील आजार आजकाल सामान्य झाले आहेत. सगळीकडे हार्ट अटॅकचे प्रमाण देखील वाढलं आहे. आधी वय वाढलं की हार्ट अटॅकचा धोका वाढत होता. मात्र आता तरूणपणात देखील तुम्हाला कधीही हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यामुळं सर्वांच्या मनात एक भीतीचं वातावरण असणं सहाजिक आहे.
मात्र आता अशा प्रकारच्या इमर्जन्सीसाठी तयार रहायला हवं. डॉक्टर अदितिज धमीता यांनी इन्स्टाग्रामवरील पोस्टवर २०२६ ला हार्ट अटॅक वर्ष संबोधलं आहे. गेल्या ५ वर्षात आपली लाईफस्टाईल जळी राहिली आहे त्याचावरून आपल्याला हार्ट अटॅक येण्याची शक्यता बळावळी आहे. त्यामुळेच आपल्या घरात अशी तीन औषधे कायम असली पाहिजेत त्याचा वापर तुम्हाला इमर्जन्सीमध्ये करता येईल.
डॉक्टरांच्या मते हार्ट अटॅकच्यावेळी एस्पिरिन रक्तातील गुठळ्यांना वाढण्यापासून थांबवण्यास मदत करते. याची एक गोळी चावून खावी. ही गोळी चावून खाल्यामुळं त्यातील औषधे रक्तात लवकर मिसळतात. ही गोळी आहे अशी गिळणे सहसा टाळावे.
हे औषध हे एक अँटी प्लेटलेट औषध आहे. हे औषध एस्पिरिनसोबत मिळून रक्त पातळ करण्यास मदत करतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ही गोळी तुम्ही पाण्याच्या एका छोट्या घोटासोबत पूर्णपणे गिळणे गरजेचे आहे. ही गोळी चावून खायची नाहीये.
डॉक्टरांच्या मते ही गोळी धमण्यांमध्ये असलेल्या प्लाकला स्टेबल ठेवण्यात मदत करते. त्यामुळे ब्लॉकेजचा धोका कमी होतो. त्याचबरोबर हे औषध ह्रदयाच्या स्नायूंना देखील सुरक्षित ठेवण्यात मदत करते. ही गोळी थोड्या पाण्यासोबत गिळावी.
डॉक्टरांच्या मते या तीन गोळ्या एकत्र घेतल्या पाहिजे. हार्ट अटॅकसारखी स्थिती असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे. वैद्यकीय मदत मिळेपर्यंत इमर्जन्सीच्या स्थिती ही औषधे घेतली जाऊ शकतात. हार्ट अटॅकच्या स्थितीत एक एक सेकंद अत्यंत महत्वाचा असतो. तुमचे थोडेसे शहाणपण कोणाचा तरी जीव वाचवू शकते.
टीप : वरील बातमी ही सामान्या माहितीच्या उद्येशाने लिहिली गेली आहे. या बातमीला एक वैद्यकीय कल्ला किंवा पर्याय असे मानले जाऊ नये. सर्व आरोग्यासंबंधीच्या समस्या किंवा मेडिकल कंडीशनबाबतच्या प्रश्नांसाठी नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.