सख्ख्या चुलत भावांमध्ये शेतात गाय बांधल्‍यावरून मारामारी; आईचा मृत्‍यू | पुढारी

सख्ख्या चुलत भावांमध्ये शेतात गाय बांधल्‍यावरून मारामारी; आईचा मृत्‍यू

पौड; पुढारी वृत्तसेवा : घोटावडे (ता. मुळशी, जि. पुणे) येथे असलेल्या लांडगेवाडी येथे गाय आमच्या शेतात का बांधली या कारणावरून आज (शनिवार) सकाळी सख्ख्या चुलत भावांमध्ये मारामारी झाली. यामध्ये महादेव लांडगे (वय ३३) आणि त्याचे वडील गुलाब बाबू लांडगे, आई मुक्ताबाई लांडगे, बायको सुरेखा लांडगे, मुलगा वैभव लांडगे यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत आई मुक्ताबाई लांडगे यांचा मृत्यू झाला.

घोटावडे येथे आज सकाळी महादेव याचे सख्खे चुलत भाऊ दत्ता लांडगे, प्रविण लांडगे व त्यांची आई सुमन लांडगे यांनी महादेव लांडगे यांना गाय आमच्या शेतात का बांधली असे विचारले. यावरून वादावादीला सुरूवात झाली. वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले.

यामध्ये दत्ता लांडगे, प्रविण लांडगे व सुमन लांडगे यांनी महादेव लांडगे, मुक्ताबाई लांडगे यांना काठ्या, कुह्राड व कोयत्याने घरातील पाच जणांना बेदम मारहाण केली.

सख्ख्या चुलत भावांमध्ये झालेल्या मारामारीत मुक्ताबाई यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा महादेव याला पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर इतर तीन जणांनाही मारहाण झालेली आहे.

घटनेची माहिती मिळताच पौडचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, शिवसेना समन्वयक प्रकाश भेगडे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे, भाजपाचे रामचंद्र देवकर, पोलिस पाटील दिपक मातेरे, भेगडेवाडीचे पोलिस पाटील सुनिल माकर, पोलिस हवालदार अनिता रवळे, सुधीर होळकर, राँकी देवकाते यांनी घटनास्थळावर धाव घेतली.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय

Back to top button