Heart : हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे? कशी घ्याल खबरदारी?

Heart : हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे? कशी घ्याल खबरदारी?
Published on
Updated on

डॉ. बिपीनचंद्र भामरे

नुकतीच तुमच्या हृदयाची (Heart) शस्त्रक्रिया झाली असेल त्यातून बरे होत असताना तुमच्या मनात अनेक  शंका, प्रश्न येत असतील. हृदयाच्या बायपास शस्त्रक्रियेनंतर सर्वसामान्य आयुष्यात परतताना तुम्हाला काही गोष्टींचे पालन करावे लागेल. हृदयाची शस्त्रक्रिया करणे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक असू शकते. तुमची शस्त्रक्रिया झाली आहे आणि तुमच्या मनात अनेक शंका असतील, तर वेळीच संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जीवनशैलीत काही बदल करणे तुमच्यासाठी आवश्यक आणि तितकेच उपयुक्त ठरेल. शस्त्रक्रियेनंतरची काळजी आणि घ्यावी लागणारी खबरदारी कोणती, हे जाणून घेऊ या…

आधुनिक तंत्रज्ञानासह केल्या जाणाऱ्या हृदय शस्त्रक्रियेचे परिणाम उत्कृष्ट आहेत. ज्यामध्ये हॉस्पिटलमध्ये रहावा  लागणारा काळ देखील कमी आहे. बहुतेक पेशंट शस्त्रक्रियेनंतर 5 व्या दिवशी घरी जाऊ शकतात. असे आढळून आले आहे की, शस्त्रक्रियेच्या ५ व्या दिवसानंतर रुग्णाच्या पुनर्प्राप्तीसाठी घरातील वातावरण चांगले ठरु शकते.

या गोष्टींचे पालन नक्की करा…

१) बहुतेक रुग्ण शस्त्रक्रियेनंतर तीन ते चार महिन्यांत त्यांच्या नियमित दिनचर्येत परततात. दर आठवड्याला, तुम्ही तुमची उर्जा आणि शारीरीक हलचाली वाढवत जा.

२) सुरुवातीला, कपडे घालणे, वैयक्तिक स्वच्छता, वाचन, लेखन, भेट देणे, चालणे आणि विश्रांती घेणे यामुळे तुमचा दिवस भरला पाहिजे. फिजीओथेरपिस्टने तुम्हाला दिलेल्या व्यायामाचे नियम पाळा. जड वस्तू, सामान, फर्निचर इत्यादी उचलू नका. पहिले सहा आठवडे ६ किलोपेक्षा जास्त वजन उचलू नका.

३) लक्षात ठेवा, सौम्य दैनंदिन क्रिया बरे होण्यास मदत करते आणि पुनर्प्राप्तीस गती देते. तुम्ही प्रत्येक आठवड्यात उत्तरोत्तर जास्त काळ चालण्याची योजना करावी. जिना चढताना थकवा आला असेल, दम लागला असेल किंवा चक्कर येत असेल, तर पायरीवर बसून विश्रांती घ्या आणि बरे वाटल्यावरच पुढील पायरी चढा. शस्त्रक्रियेनंतर २-३ महिन्यांनंतर तुम्ही दैनंदिन काम करु शकता.

४) शस्त्रक्रियेच्या (Heart) तारखेपासून किमान ३ महिने मोटरसायकल चालवू नका. वेळोवेळी तुमच्या वजनाचे निरीक्षण करण्याचा प्रयत्न करा आणि चढ-उतार देखील लक्षात घ्या.

५) हृदयाच्या शस्त्रक्रियेमुळे तुमची भरपूर ऊर्जा खर्च होते आणि विश्रांतीने तुम्ही बरे व्हावे. जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे बरे होत नाही तोपर्यंत ड्रायव्हिंग आणि इतर कोणत्याही कठोर क्रियाकलाप टाळा. जोपर्यंत तुमचे डॉक्टर तुम्हाला जाण्यास सांगत नाहीत तोपर्यंत लांबच्या सहलीला जाऊ नका.

६) तुमची औषधे वेळेवर घ्या. तुम्ही घरी परत आल्यावर मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची औषधे तसेच डॉक्टरांनी सांगितलेली इतर औषधे घ्या. फॉलो-अपसाठी जा, आणि कोणत्याही असामान्य बदलांची डॉक्टरांना कल्पना देत रहा.

७) संतुलित आहार घ्या. शस्त्रक्रियेनंतर, योग्यरित्या बरे होण्यासाठी, तुम्हाला हृदयासाठी अनुकूल पदार्थ खावे लागतील. ताजी फळे, भाज्या, शेंगा आणि मसूर खा. प्रक्रिया केलेले, जंक आणि तेलकट पदार्थ सोडून देणे योग्य ठरेल.

८) तणावमुक्त राहा. तुम्हाला तणाव, चिंता किंवा नैराश्य टाळावे लागेल. तुमची आवडती गाणी ऐकून ध्यान करण्याचा किंवा आराम करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी बोलण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला. तुम्हाला नक्कीच बरे वाटेल.

हे ही वाचा…

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news