पगारात बचत करुन करोडपती व्हायचंय? ‘हा’ फंडा फॉलो करा | पुढारी

पगारात बचत करुन करोडपती व्हायचंय? 'हा' फंडा फॉलो करा

पुढारी ऑनलाईन डेस्क : करोडपती होण्याचे सर्वांचे स्वप्न असते. पण पगार किंवा मासिक उत्पन्न प्रत्यक्षात कमी असते, आणि अनेकांचे हे स्वप्न काही प्रत्यक्षात येत नाही. पण तुम्ही जर थोडे नियोजन केले आणि योग्य गुंतवणूक केली तर तुम्ही कमी पगारातही करोडपती होऊ शकता.

किती गुंतवणूक करावी?

सर्वसाधारणपणे आपल्या मासिक पगाराच्या १५ ते २० टक्के रक्कम गुंतवणूक केली पाहिजे, असे मानले जाते. तुम्ही जेवढी जास्त रक्कम गुंतवू शकाल तेवढ्या कमी कलावधित तुम्ही अधिकाधिक परतावा मिळवू शकतो.

Money पैसे

करोडपती कसे बनायचे?

चांगला परतावा मिळवण्यासाठी आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून Equity Mutual Fund सर्वोत्तम मानले जातात. यामध्ये वार्षिक १२ टक्के इतका परतावा मिळू शकतो. कमी रक्कम गुंतवत तुम्ही कमी काळात फार चांगले सेव्हिंग करू शकता. Equity Mutual Fund मध्ये थोडी जोखीम असली तर महागाईचा दर लक्षात घेतला तर या प्रकारचे Mutual Fund आपले सेव्हिंग सुरक्षित ठेवतातच शिवाय परतावा ही देतात.

SIPने सुरुवात करा

करोडपती बनण्यासाठी तुम्हाच्या मदतीला येतील ते सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा SIP. कॉम्पाऊंडिग फॅक्टरमुळे तुमची लहान रक्कमेतूनही भविष्यात मोठा धनसंचय होऊ शकतो. अर्थात यासाठी आर्थिक शिस्त पाळावी लागते. समजा तुमचा मासिक पगार ५० हजार रुपये आहे. यातील तुम्ही १५ ते २० टक्के रक्कम जर SIPच्या माध्यमातून Equity Mutual Fund मध्ये गुंतवली तर तुम्ही कमी कालवधित १ कोटी रुपयापर्यंत एकूण रक्कम मिळवलेली असेल.

Money पैसे
Money पैसे

समजा तुम्ही १५ टक्के रक्कम गुंतवण्याचा निर्णय घेतला तर तुम्ही महिन्याला ७५०० रुपये गुंतवू शकता. जर कमीतकमी १२ टक्के परतावा मिळाल तर २७६ महिन्यांत किंवा २३ वर्षांत तुम्ही १ कोटी रुपये मिळवलेली असतील.
समजा तुम्ही २० टक्के रक्कम म्हणजेच १० हजार रुपये या योजनेत गुंतवले तर २४९ महिन्यांत किंवा २०.७५ वर्षांत १ कोटीच्या वर रक्कम मिळवलेली असेल.

स्टेप अप SIP म्हणजे काय?

स्टेप अप SIP हा एक चांगला प्रकार गुंतवणुकीसाठी आहे. यात तुम्ही दरवर्षी तुम्ही गुंतवणुकीचे प्रमाण वाढवत जाता. समजा तुम्ही SIPमध्ये ७५०० रुपये दरमहा गुंतवले आणि दरवर्षी यात ५ टक्के वाढ करत गेला तर तुम्ही २०.३३ वर्षांत एकूण १ कोटी रुपये सेव्ह केलेले असतील. समजा तुम्हील १० प्रति महिना १०,००० रुपयांना सुरुवात केली आणि दरवर्षी त्यात ५ ट्क्के इतकी भर टाकली तर १२ टक्के इतक्या परताव्याने तुम्ही १९४ महिन्यात करोडपती झालेला असाल.

बचत

संयम ठेवा

SIPच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचे एक महत्त्वाचे सूत्र आहे ते म्हणजे संयम. शेअर बाजार वाढला किंवा कोसळला म्हणून घाईगडबडीत तुमची गुंतवणूक काढून घेऊ नका. नेहमी दीर्घकालीन विचार करून गुंतवणूक करा.

हेही वाचा

Back to top button