जगभरातील या १० देशांना पर्यटकांची सर्वाधिक पसंती

जगभरातील या १० देशांना पर्यटकांची सर्वाधिक पसंती

पुढारी ऑनलाईन डेस्क : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ने अलीकडेच प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक (TTDI) जाहीर केला आहे. या निर्देशांकात प्रवास आणि पर्यटनाच्या बाबतीत टॉप 10 देशांची यादी प्रसिद्ध केली आहे. या निर्देशांकात अमेरिकेने सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून स्थान मिळवले आहे. तर पृथ्वीवरील स्वर्ग, अशी बिरूदावली मिळवलेल्या युरोपीयन देश स्वित्झर्लंड 10 व्या स्थानावर आहे.

TDI निर्देशांकातील देशांची यादी तयार करताना प्रवास आणि पर्यटन क्षेत्रातील शाश्वत विकासाला चालना देणारे घटक आणि धोरणे विचारात घेतली जातात. ज्यामुळे देशाच्या विकासाला हातभार लागतो. 2024 या वर्षासाठी 119 देशांचा या निर्देशांकात समावेश करण्यात आला आहे.

TTDI निर्देशांकातील पहिल्या पाच देशांमध्ये भेट देण्याची ठिकाणे खालीलप्रमाणे

अमेरिका

अमेरिकेत स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, ग्रॅन कॅनन, ग्लेशियर नॅशनल पार्क, यलोस्टोन नॅशनल पार्क ही ठिकाणे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. येथे तुम्ही सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क सारख्या सुंदर शहरांनाही भेट देऊ शकता. 2023 मध्ये, 80 दशलक्ष परदेशी पर्यटकांनी अमेरिकेला भेट दिली होती. त्यामुळे देशाच्या GDP मध्ये 1.8 ट्रिलियन डॉलर्सची भर पडली होती.

स्पेन

स्पेन विशेष वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे, तुम्ही बार्सिलोना आणि ग्रॅनाडा सारख्या शहरांना भेट देऊ शकता. देशातील समुद्रकिनारे खूप सुंदर आहेत. आणि इथले सर्व सण देखील खूप उत्साहाचे असतात. 2023 मध्ये 70 दशलक्ष पर्यटकांनी स्पेनला भेट दिली. त्यामुळे 150 अब्ज डॉलर्सचा महसूल स्पेनला मिळाला होता.

जपान

जपानच्या पर्यटकांना परंपरा आणि आधुनिक आविष्कारांचा अप्रतिम संगम आवडतो. क्योटो शहरातील मंदिरे आणि टोकियो शहरातील चकाचक रस्ते खूप प्रसिद्ध आहेत. 2023 मध्ये 30 दशलक्ष परदेशी पर्यटक जपानमध्ये आले होते. पर्यटनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला 300 अब्ज डॉलर्सचा फायदा झाला आहे.

फ्रान्स

फ्रान्समधील आयफेल टॉवर पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. येथील प्रोव्हन्स प्रदेशातील गावांची गणना जगातील सर्वात सुंदर गावांमध्ये केली जाते. दरवर्षी 80 दशलक्ष पर्यटक फ्रान्सला भेट देतात, त्या माध्यमातून 200 अब्ज डॉलर्सचे उत्पन्न देशाला मिळते.

ऑस्ट्रेलिया

नैसर्गिक सौंदर्य आणि विविध प्रकारच्या वन्य प्राण्यांनी भरलेल्या ऑस्ट्रेलियात दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. सिडनी, मेलबर्न सारख्या शहरांमध्ये प्रवास केल्याने तुम्हाला एक वेगळा आणि अनोखा अनुभव मिळतो. 2023 मध्ये 80 लाख पर्यटक ऑस्ट्रेलियात आले होते, त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला 60 अब्ज डॉलर्सचा फायदा झाला होता.

जगभरातील टॉप 10 देश सर्वाधिक पर्यटकांना आकर्षित करतात.

1. अमेरिका (स्कोअर 5.24)
2. स्पेन (स्कोअर 5.18)
3. जपान (स्कोअर 5.09)
४. फ्रान्स (स्कोअर ५.०७)
५. ऑस्ट्रेलिया (५.००)
6. जर्मनी (5.00)
7. ब्रिटन (4.96)
8. चीन (4.94)
9. इटली (4.90)
10. स्वित्झर्लंड (4.81)

भारताची क्रमवारी किती आहे?

या निर्देशांकात भारताचे रँकिंग ३९वे आहे. WEF ने सांगितले की, भारतातील नैसर्गिक (6वा), सांस्कृतिक (9वा) आणि नॉन-लिझर (9वा) संसाधने पर्यटन उद्योगाला चालना देतात.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news