Children Growth Tips | तुमच्या मुलांची वाढ खुंटली आहे का? जाणून घ्या ‘कॅच-अप ग्रोथ’ची संकल्पना

Children Growth Tips
Children Growth Tips
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज, जगभरात पाच वर्षांखालील वयोगटात वाढ खुंटलेल्या मुलांची संख्या सुमारे १४९ दशलक्ष इतकी आहे. खरेतर जागतिक आरोग्य परिषदेच्या अहवालातून असे आढळून आले आहे की, अशा मुलांच्या जागतिक आकडेवारीमध्ये एक तृतीयांश मुले भारतातील आहेत. भारतात पाच वर्षांखालील वयोगटातील वाढ खुंटलेल्या मुलांची संख्या ४०.६ दशलक्ष इतकी आहे. (Children Growth Tips)

मुलांच्या बालपणीचा काळ हा झरझर वाढीचा अन् विकासाचा असतो. पण काही कारणांमुळे मुलांच्या वाढीचा वेग मंदावतो. त्यामध्ये ठराविक वयात मुलांची वाढ खुंटण्याची समस्या ही एकतर अपुऱ्या पोषक आहारामुळे किंवा काही वेळा नैसर्गिकरित्या निर्माण होऊ शकते. कालांतराने दुर्लक्ष केल्यास याचे रूपांतर गंभीर आजारात होण्याची दाट शक्यता असते.  या पार्श्वभूमीवर कॅच-अप ग्रोथ म्हणजे नेमके काय, त्याची कारणे कोणती आणि कॅच-अप ग्रोथच्या या प्रवासात पालक आपल्या मुलांची कशाप्रकारे मदत करू शकतात. याविषयी अधिक सखोल माहिती मिळविण्याचा प्रयत्न करू या. (Children Growth Tips)

Children Growth Tips : 'कॅच-अप ग्रोथ' म्हणजे काय?

कुपोषण हे मुलांची वाढ खुंटण्यामागचे एक प्राथमिक कारण आहे. बरेचदा मुलांना पुन्हा एकदा पुरेसे पोषण मिळू लागले की, त्यांच्या उंची व वजनात वेगाने वाढ झाल्याचे (ग्रोथ स्पर्ट) दिसून येते. याला उत्स्फूर्तपणे वा आपणहून झालेली कॅच-अप (CU) वाढ असे म्हणतात. यामुळे मुलांचे वाढीच्या दिशेने चाललेले मार्गक्रमण पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू होते. ज्या मुलांचा विकास मागे पडत असेल, त्यास बरेचदा अधिकच्या कॅलरीज, प्रथिनं आणि सूक्ष्मपोषक घटकांची गरज असते. हे पोषक घटक दुहेरी हेतू साध्य करतात. त्यांच्यामुळे अपुऱ्या आहाराच्या कालावधीमध्ये राहून गेलेली पोषणातील तूट भरून निघतेच पण त्याचबरोबर पुढील वाढीसाठीही या पोषणाची मदत होते.

अनेक मुले पोषक आहार घेत आहेत हे खरे असले, तरीही कार्यक्षम पोषण मिळविण्याचे आव्हान पूर्ण करणे गरजेचे आहे. कॅल्शियम, लोह आणि झिंक यांसारखी खनिजे मुलांची वाढ व विकासासाठी अत्यावश्यक असतात. त्याचबरोबर मुलांनी शारीरिक हालचालींची व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यामुळे या जीवनशैलीसाठी प्रोत्साहन देणे हा सुद्धा त्यांच्या सर्वांगिण स्वास्थ्याच्या जोपासनेतील एक प्रमुख घटक आहे.

पोषक घटकांच्या मदतीने वाढीस प्रोत्साहन कसे द्यावे

योग्य पोषणाचा पुरवठा करणे हे मुलांच्या निरोगी वाढीसाठी आणि सर्व टप्प्यांवरील विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. वयाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासूनच मुलांना असे पोषण जाणीवपूर्वक पुरविणे अत्यावश्यक असते. पोषक घटकांचा अपुरा पुरवठा अर्थात अंडरन्युट्रिशनची समस्या समजून घेण्याची आणि त्यावर उपाय शोधण्याची गरज आहे. अपुरा आहार, पोषक घटक शरीरामध्ये इष्टतम प्रमाणात शोषले न जाणे किंवा पुरेशा कार्यशील नसलेल्या पोषक घटकांचा आहारात समावेश असणे यामुळे ही समस्या उद्भवू शकते. अगदी लहान वयापासूनच मुलांच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित केल्यास कुपोषणामुळे त्यांच्यातील वाढीच्या शक्यतांवर होणारे गंभीर परिणाम टाळता येतील आणि मुले आपल्या वाढीची कमाल क्षमता प्राप्त करतील याची हमी मिळेल.

आरोग्यसेवा चिकित्सकांची मदत घ्या

बालपणातील पोषणाचे मूल्यमापन ही गोष्ट तुमचे मूल नियमितपणे भाज्या खाईल इतक्याच गोष्टीची काळजी घेण्यापुरती मर्यादित नाही. तर ती एक बहुपेडी प्रक्रिया आहे. उत्तम पोषणाचा मुख्य परिणाम हा केवळ इष्टतम उंची मिळविण्यापुरता मर्यादित नाही, तर मुलांच्या संज्ञानात्मक विकासाला पाठबळ देणे आणि त्यांची रोगप्रतिकारशक्ती बळकट करण्याशीही त्याचा संबंधित आहे. वाढीच्या बाबतीत मागे राहीलेल्या मुलांवर उपचार करण्यासाठी आरोग्यसेवा चिकित्सकांची मदत घ्यायला हवी.

मुलांच्या निरोगी आणि सर्वांगीण वाढीस प्रोत्साहन देणे

बहुतेकवेळा लहान मुले शारीरिकदृष्ट्या मोठ्या माणसांहून अधिक सक्रिय असतात. त्यामुळे त्यांना भूकही तुलनेने अधिक लागते. त्यामुळे मुलांना विविध सकस पदार्थ आणि पोषक घटक असलेला संतुलित आहार द्यावा याची काळजी पालकांनी घ्यावी. पुढील काही आरोग्यदायी सवयींच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलांचा विकास साधला जाईल याची दक्षता घेऊ शकता.

मुलांच्या वाढीचे नियमित मोजमाप घ्या

आपल्या मुलांच्या, विशेषत: २-६ वर्षे वयाच्या मुलांच्या वाढीवर नियमितपणे लक्ष ठेवण्यापासून सुरुवात करा. दर तीन महिन्यांनी त्यांचे मोजमाप घ्या आणि यासाठी पालकांना ग्रोथ डायरी किंवा ट्रॅकरसारख्या साधनांचा वापर करता येईल. अचूक मोजमाप हे मुलांच्या वाढीची माहिती मिळविण्यासाठी आणि तिचा मागोवा घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. इतकेच नव्हे तर असे मोजमाप ठेवल्याने मुलांच्या वाढीमध्ये काही कमतरता राहत असल्यास ते लवकर लक्षात येऊ शकते आणि पालक त्वरेने त्यामागचे कारण शोधण्यासाठी व त्यावरील उपचारांसाठी प्रयत्न सुरू करू शकतात.

योग्य संतुलित आहार

आपल्या मुलांच्या सर्वांगीण वाढीला मदत करण्यासाठी त्यांना धान्ये, डाळी, दूध, मांस, फळे आणि भाजी समावेश असलेला संतुलित आहार दररोज द्यायला हवा. यामुळे मुलांना हाडांच्या विकासासाठी आवश्यक असलेली प्रथिनं, जीवनसत्वे आणि खनिजे खात्रीने मिळतात. सर एच. एन. रिलायन्स फाउन्डेशन हॉस्पिटलचे डॉ. पंकज पारेख (एमडी पीडिएट्रिक्स आणि डीसीएच) सांगतात, "जेवताना धसमुसळेपणा करणाऱ्या मुलांच्या पालकांनी मुलांना एक परिपूर्ण आहार देण्यासाठी तोंडावाटे घ्यावयाच्या सप्लिमेंट्सचा विचार करायला हवा. बाजारात जाणे, रोजच्या जेवणात काय असावे याचे नियोजन करणे आणि स्वयंपाक या कामांमध्ये मुलांना सामील करून घ्या, जेणेकरून आपल्या मदतीने बनलेले पदार्थ खाण्यात त्यांना रस वाटेल. कुकी कटर्ससारखी साधने वापरून पदार्थांना विविध गंमतीजंमतीचे आकार द्या, त्यात सफरचंद, काकडीसारख्या फळांचा, भाज्यांचा समावेश करा आणि विविध प्रकारचे पदार्थ असलेला रंगीबेरंगी नाश्ता व जेवण त्यांना द्या."

दररोज किमान ३ तास व्यायाम करावा

मुलांच्या स्क्रीन टाईमवर मर्यादा आणण्यासाठी त्यांच्यासाठी व्यायामाचा एक संतुलित दिनक्रम तयार करा. सुट्टीच्या दिवशी मुलांना 'गॅजेट-फ्री' दिवस पाळण्यासाठी आणि संपूर्ण कुटुंबाबरोबर वेळ घालविण्यासाठी प्रोत्साहित करा. मुलांनी दररोज किमान ३ तास तरी कोणता तरी शारीरिक व्यायाम करावा याकडे लक्ष द्या. यात पोहणे, धावणे, दोरीउड्या, चालणे किंवा नृत्य यांसारख्या गोष्टींचा समावेश असू शकतो. हाडांच्या आरोग्यात सुधारणा घडवून आणण्यामध्ये आणि एकूणच सर्वांगीण स्वास्थाला पाठबळ देण्यामध्ये शारीरिक व्यायामाची भूमिका महत्त्वाची असते.

सर्वसमावेशक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी एक परिपूर्ण आहार आवश्यक ठरतो, कारण त्यामुळे महत्त्वाचे पोषक घटक शरीरात अधिक चांगल्या प्रकारे शोषले जातात. तुमच्या मुलांच्या आहारातून त्यांना पुरेशा कॅलरीज आणि पोषक घटक मिळत नसतील तर ती कमतरता भरून काढण्यासाठी न्यूट्रिशन सप्लिमेंट्सची मदत होऊ शकते. ही सप्लिमेंट्स वाढीमधील तूट भरून काढण्याचे कामही करतात, तसेच वाढीला चालना देत मुलांना आहारातून मिळणाऱ्या अत्यावश्यक जीवनसत्व आणि खनिजांना सामावून घेण्याची शरीराची क्षमताही वाढवितात. म्हणजे यामुळे पोषक तत्वांच्या शोषणाचे प्रमाण वाढते, जेणेकरून शरीराला जास्तीत-जास्त पोषण मिळावे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news