HOW TO SAY ‘NO’ : यशस्‍वी होण्‍यासाठी ‘नाही’ म्‍हणता आलं पाहिजे, कसे म्‍हणावे जाणून घ्‍या…

HOW TO SAY ‘NO’ : यशस्‍वी होण्‍यासाठी ‘नाही’ म्‍हणता आलं पाहिजे, कसे म्‍हणावे जाणून घ्‍या…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कारण व्‍यावसायिक असो की व्‍यक्‍तिगत एखादी गोष्‍ट तुम्‍हाला आवडत नसेल तरी तुम्‍हाला ती करावी लागते. काही अपरिहार्य कारणांमुळे तुम्‍हाला नकार देता येत नाही;पण मनाविरुद्ध केलेल्या कामांमुळे तुम्‍हाला शारीरीक व मानिसक त्रासाला सामोरे जावे लागतेच. एखादी गोष्ट पटत नसेल तर नाही म्हणता येणे आवश्यक ठरते. अनेक यशस्‍वी लोकांमध्‍ये सर्वात महत्त्‍वाचा गुण कोणता होता तर त्‍यांना एखाद्‍या गोष्‍टीला नाही म्‍हणणायचे धाडस होते. ( HOW TO SAY 'NO' ) यशाबरोबरच मानसिक तणाव कमी करण्‍यासाठी तुम्‍हाला न पट‍णाऱ्या गोष्टींसाठी नाही म्हणता येणे आवश्यक आहे. करिअर मार्गदर्शक आणि व्यवस्थापन क्षेत्रातील सल्‍लागार प्रियांक आहुजा यांनी नाही कसे म्‍हणावे, याबाबत काही टीप्‍स दिल्‍या आहेत. या विषयी जाणून घेवूया …

HOW TO SAY 'NO' : नाही म्‍हणण्‍याचे कारण थोडक्‍यात स्‍पष्‍ट करा

आपल्‍या व्‍यावसायिक आणि वैयक्‍तिक जीवनात अनेक ऑफर येत असतात. उदा. व्‍यावसायिक म्‍हटलं की नवीन गुंतवणुकीची कोणती तरी तुम्‍हाला ऑफर देते. तर वैयक्‍तिक आयुष्‍यात तुम्‍हाला मनाविरूद्ध गोष्टी करण्याचा सल्‍ला देतात. याला नकार देताना हे थोडक्‍यात स्‍पष्‍ट करा. तसेच नकार अत्‍यंत विनम्रपणे क‍ळवा. त्‍यामुळे तुम्‍हाला त्रास होणार नाही, आणि नकार दिला म्‍हणून समोरील व्‍यक्‍तीही नाराज होणार नाही.

नाही म्‍हणताना जास्‍त भावनिक होऊ नका

अनेकवेळा काही गोष्‍टी तुम्‍हाला टाळायच्‍या असतात. यामुळे होणार आर्थिक आणि मानसिक त्रास तुम्‍हाला नको असतो;पण याला नाही म्‍हणताना तुम्‍ही भावनिक होता. यावेळी तुम्‍ही सर्व गोष्‍टींचा सारासार विचार करुन ठामपणे नाही म्‍हणायला शिका. अस्‍थिरपणा सोडा. तुम्‍ही घेतलेल्‍या निर्णयावर ठाम रहा.

तुम्‍ही पर्याय द्‍या

तुम्‍ही तुमच्‍या महत्त्‍वाच्‍या कामात व्‍यस्‍त असता त्‍यावेळी तुमचे नातेवाईक किंवा कार्यालयातील सहकारी तुमची मदत मागतात. त्‍यावेळी तुम्‍हाला तुमचं काम महत्त्‍वाचे वाटत असते. अशावेळी मी माझ्‍या हातातील काम प्रथम पूर्ण करणार आहे, असे स्‍पष्‍ट करत संबंधितांची माफी मागा आणि त्‍यांनी मदतीचा पर्याय सुचवा.

नाही म्‍हणताना होणार्‍या परिणामाची कल्‍पना करा

तुम्‍ही एखाद्‍या गोष्‍टीला नकार देता त्‍यावेळी काय परिणाम होईल याचा विचार करा. आपण नाही म्‍हटल्‍याने वाईटात वाईट काय होईल, यामुळे तुमच्‍या जगण्‍यात काय बदल होतील, याचा विचार करुन सकारात्‍मक विचारासाठी अयोग्‍य बाबींना नाही म्‍हणण्‍यावर ठाम रहा.

तुमचा प्राधान्‍यक्रम स्‍पष्‍ट करा

क्षेत्र कोणतेही असो तुम्‍हाला यशस्‍वी असेल योग्य नियोजन खूप महत्‍वाचे ठरते. तुमच्‍यासाठी काय महत्त्‍वाचे आहे याला प्राधान्‍य द्या. एकदा तुमचा प्राधान्‍यक्रम स्‍पष्‍ट झाला की, कशाला नाही म्‍हणायचे आणि कशासाठी होकार द्यावा हे स्‍पष्‍ट होते. तुमच्‍यावर कोणी अतिरिक्‍त जबाबदारी टाकत असेल तर तुमच्याकडे असणार्‍या कामाच्या नियोजनानुसार तुमचा निर्णय घ्या.

तुम्‍ही तुमच्‍या तत्‍वांशी प्रामाणिक रहा

तुम्‍ही नेहमीच तडजोडीचे धोरण स्‍वीकारत राहिलात तर त्‍यातून निर्माण हो‍‍णार मानसिक ताण हानीकारक ठरतो.त्‍यामुळे तुमच्‍या आवडी-निवडी स्‍पष्‍ट असाव्‍यात. तुम्‍ही तुमच्‍या तत्‍वांशी प्रामाणिक असाल तर निश्‍चितच नाही म्‍हणायचे बळ तुम्‍हाला मिळते. एखादी ऑफर मग ती व्‍यावसायिक असो की वैयक्‍तिक ती तुमच्‍या तत्‍वांमध्‍ये बसत नसेल तर स्‍पष्‍ट नाही म्‍हणणे हे यशस्‍वी होण्‍याची पहिली पायरी ठरते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news