HairStyle: ‘अशी’ करा उत्तम ‘हेअरस्टाईल’ अन् खुलवा सौंदर्य…! | पुढारी

HairStyle: 'अशी' करा उत्तम 'हेअरस्टाईल' अन् खुलवा सौंदर्य...!

स्वाती देसाई

स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालत असेल तर तो त्यांचा केशसंभार. काळेभोर केशसंभार पाहिला तर नजर हटत नाही. त्यात जर वेगवेगळ्या हेअरस्टाईल असेल तर मग लूक आणखीनच खुलतो. तुमच्या चेहर्‍यानुसार वेगवेगळा हेअर कट केल्यास व्यक्तिमत्त्व सुंदर बनते. त्यासाठी थोड्याशा कल्पकतेचा विचार करायला हवा. (HairStyle)

जर तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्त्व खुलवायचे असेल तर आपल्या चेहर्‍याचा आकार लक्षात घेऊन त्याप्रमाणे हेअरकट करायला हवा. चेहर्‍याला शोभून न दिसणारा हेअरकट केला तर व्यक्तिमत्त्व उठावदार दिसत नाही. जर चेहरा बदामाच्या आकाराचा असेल तर टोकदार हनुवटी झाकण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी डोळे आणि गालांची ठेवणही लक्षात घ्यावी लागते. अशा प्रकारचा चेहरा असलेल्या तरुणींनी मानेपर्यंत लांब केस ठेवून काही बटा कपाळापासून पुढे काढाव्यात. (HairStyle)

बदामी चेहर्‍याच्या तरुणींनी ब्लंट करणे टाळावे. चेहरा आयताकृती असेल तर कर्ली किंवा चॉपी कट उठून दिसेल. केसांसाठी स्किपी कट तर मोठ्या केसांसाठी लेअर कट केला तर चेहर्‍याचे सौंदर्य खुलून दिसेल. गोल चेहर्‍याला अंडाकृती रूप देण्यासाठी चेहर्‍याच्या आजुबाजूला कमीत कमी केस असावेत. केस लहान असतील तर ते कुरळे करून घेण्याची चूक करू नये. कारण कुरळ्या केसांमुळे चेहरा आणखीनच गोल दिसतो. चेहरा उभट असेल तर बॉबकट खुलून दिसतो. कुरळे केस अशा चेहर्‍याच्या तरुणींना शोभून दिसतात; पण जर केस लांब असतील तर त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. (HairStyle)

हेही वाचा:

Back to top button