Market Closing Bell : गुंतवणूकदारांची ‘सावध’ चाल!, जाणून घ्‍या बाजारात आज काय घडलं?

Market Closing Bell : गुंतवणूकदारांची ‘सावध’ चाल!, जाणून घ्‍या बाजारात आज काय घडलं?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जागतिक बाजारातून मिळत असणारे सकारात्‍मक संकेत, आशियामधील मार्केटमध्‍ये झालेली वाढ, अमेरिकन बाजारात सलग चौथ्‍या दिवशी राहिलेली तेजी आणि क्रूड तेल दरातील स्‍थिरता याचा सकारात्‍मक परिणाम आज ( दि. १२ ) भारतीय शेअर बाजारातही प्रारंभी दिसून आला. आयटी क्षेत्र वेगळताअन्‍य कंपन्‍यांनी अल्‍पतेजीही अनुभवली. मात्र दुपारनंतर तेजीचा हा आलेख स्‍थिरावला. नंतर सेन्सेक्स-निफ्टी लाल चिन्हावर परतले. अखेर चढ-उतार अनुभवत आजच्‍या व्‍यवहारात BSE सेन्सेक्स 64 अंकांनी घसरला आणि 66,408 वर  तर निप्‍टी 19,794.00वर बंद झाला.

सकारात्‍मक सुरुवात, पण….

बुधवारी बीएसई सेन्‍सेक्‍स ३९३ अंकांच्या वाढीसह ६६,४७३ वर बंद झाला होता. सलग तिसर्‍या सत्रात शेअर बाजारामधील व्‍यवहारांची आज (दि.१२) सकारात्‍मक सुरुवात झाली. NSE निफ्टी ५० अंकांनी वधारत १९,८२२.७० वर तर BSE सेन्सेक्स ९१.५२ अकांनी वाढत ६६,५६४.५७ वर उघडला. बँक निफ्टी निर्देशांक ५४.६५ अंकांनी वाढून ४४,५७१.५५ वर पोहचला. आयटी वगळता अन्‍य शेअर्सने व्‍यवहाराची सुरुवात सकारात्‍मक केल्‍याचे दिसले. मात्र सुरुवातीच्या वाढीनंतर, बाजारात घसरण दिसली. सेन्सेक्स-निफ्टी लाल चिन्हावर परतले. दोन दिवसांच्‍या सलग तेजीनंतर आज  सेन्सेक्स आणि निफ्टी किंचित घसरणीसह बंद झाले

'या' शेअर्संनी अनुभवली तेजी

पीएसई, मेटल, ऑटो, एनर्जी शेअर्समध्ये खरेदी झाली तर आयटी, रिअल्टी शेअर्समध्ये विक्रीचा दबाव  दिसून आला. बँक, एफएमसीजी, फार्मा निर्देशांक किंचित वाढीसह बंद झाले. बीपीसीएल, कोल इंडिया, मारुती सुझुकी, एनटीपीसी आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले.

इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, एसबीआय, एनटीपीसी आणि अॅक्सिस बँकच्‍या शेअर्संनी सुरुवात चांगली झाली. तर गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, टीसीएस, झोमॅटो, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, शालिमार पेंट्स, प्लॅस्टिबलेंड्स इंडिया, एमएमटीसी, एएए टेक्नॉलॉजीज, एस्टर डीएम हेल्थकेअर आणि ड्रेजिंग कॉर्पोरेशन हे 'एनएसई' वरील सर्वात सक्रिय शेअर राहिले. आज सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी मेटल शेअर १. ४२ टक्‍क्‍यांची वाढ दिसली.

सलग तिसर्‍या दिवशी 'मिड आणि स्मॉल कॅप'ची जोरदार घोडदौड

सलग तिसर्‍या दिवशी गुंतवणूकदारांनी 'मिड आणि स्मॉल कॅप'वरील आपल्‍या विश्‍वास कायम ठेवला. इक्विटी श्रेणीमध्ये, स्मॉल कॅप फंडांनी दीर्घ कालावधीत गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. सध्या जागतिक पातळीवरील भावनांमुळे बाजारात चढ-उतार होत आहेत. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया (AMFI) ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, किरकोळ गुंतवणूकदारांचा स्मॉल कॅप फंडांवर विश्वास कायम आहे. सप्टेंबरमध्ये या श्रेणीत 2,678.47 कोटी रुपयांची गुंतवणूक आली. ऑगस्ट 2023 मध्ये 4265 कोटी रुपयांची विक्रमी आवक नोंदवली गेली. स्मॉल-कॅप फंड ही एक इक्विटी-ओरिएंटेड म्युच्युअल फंड योजना आहे, जी प्रामुख्याने स्मॉल-कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करते.

'झोमॅटो' @113

ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato च्या शेअर्समध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी जोरदार वाढ झाली. दिवसभरात सुमारे 4 टक्क्यांनी उसळी घेतली. ही कामगिरी एका वर्षातील उच्चांकी ठरली आहे. काही गुंतवणूकदारांनी या तेजीचा फायदा घेत नफा मिळविण्‍याचा प्रयत्‍न केला. झोमॅटो मागील सहा महिन्यांत गुंतवणूकदारांना ११० टक्‍के परतावा दिला आहे.

विक्रीच्‍या जोरामुळे आयटी क्षेत्राने अनुभवली घसरण

गुंतवणूकदारांच्‍या विक्रीच्‍या जोरामुळे आयटी क्षेत्रातील टीसीएस, टेक महिंद्रा कंपन्‍यांच्‍या शेअर्संनी आज घसरण अनुभवली. आयटी क्षेत्रामुळे बाजारावर दबाव दिसून आला. टेक महिंद्रा, अपोलो हॉस्पिटल्स, TCS, LTIMindtree आणि Infosys हे निफ्टीचे सर्वाधिक नुकसान झालेले शेअर्स ठरले.

प्लाझा वायर्सचे शेअर्सचे बंपर पदार्पण

बाजारात आज ( दि.१२ ) प्लाझा वायर्सचे शेअर्स IPO किमतीच्या तुलनेत 55.55% प्रीमियमवर सूचीबद्ध झाले. बीएसईवर ५४ रुपयांच्या इश्यू किंमतीच्या तुलनेत शेअर ८४ रुपयांवर खुला झाला. गुंतवणूकदारांना प्रति शेअर 30 रुपये नफा झाला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news