

पुढारी ऑनलाइन डेस्क : Google Pixel Fold : गुगल अखेर दोन वर्षानंतर आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन पिक्सेल फोल्ड लाँच करण्याच्या तयारीत आहे. गुगलच्या आगामी इव्हेंटमध्ये 10 मे रोजी आपला पिक्सेल फोल्ड स्मार्टफोनचे अनावरण करेल. सूत्रांच्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन सोनेरी रंगात असण्याची अपेक्षा आहे, परंतू लाँचच्या वेळी अन्य पर्याय असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गुगलने या स्मार्टफोनच्या प्रसिद्धीसाठी शेअर केलेल्या व्हिडिओत पिक्सेल फोल्ड फोनचा लूक समोर आला आहे. हा स्मार्टफोन थोडा मोठा दिसतो. त्याच्या मागील बाजूला एक कॅमेरा बार आहे. हा कँमेरा बार पिक्सेल 7 प्रो सारखाच आहे. जाणून घ्या काय असणार आहेत या फोनची वैशिष्ट्ये :
पिक्सेल फोल्डचा कव्हर डिस्प्ले 5.8-इंचाचे दृश्य क्षेत्र देऊ शकते
तर मुख्य स्क्रीन 7.6-इंच दृश्य क्षेत्र प्रदान करू शकते
दोन्ही डिस्प्लेमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR आणि HDR10+ सारख्या सपोर्ट टेक्नॉलॉजीज अधिक शार्प आणि वाईड असू शकतात
Pixel Fold Google Tensor G2 SoC द्वारे समर्थित असू शकते
Pixel 7 Pro सारखाच कॅमेरा सेटअप असू शकतो,
यामध्ये 50-मेगापिक्सेल वाइड कॅमेरा, 48-मेगापिक्सेल टेलीफोटो सेन्सर, आणि 10.2-इंचाचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा असू शकतो
Pixel Fold ची किंमत $1,700 (अंदाजे रु. 1.40 लाख) पेक्षा जास्त असण्याची अपेक्षा आहे. या स्मार्टफोनमधील उच्च श्रेणीची वैशिष्ट्ये पाहता आणि फोल्ड फॉर्म फॅक्टर पाहिले तर ही किंमत वाजवी आहे, असे म्हणू शकतो. Pixel Fold सोबत, Google IO इव्हेंटमध्ये Pixel 7a आणि Google Pixel टॅबलेट देखील लॉन्च करेल.
हे ही वाचा :