Sweet Dish Malpua : मुले खूप गोड खातात, मग टेस्टी मालपुआ बनवा ना! | पुढारी

Sweet Dish Malpua : मुले खूप गोड खातात, मग टेस्टी मालपुआ बनवा ना!

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या मुलांना गोड खायला फार आवडतं. मुले खूप सारे चॉकलेट्स खात असतात. कधी कधी मुलांकडून मुठीभरून साखर खाल्ली जाते. तेव्हा तुम्ही मुलांना काही चवदार गोड खायला दिला तर मुले चॉकलेट्स किंवा साखर खाणार नाहीत. (Sweet Dish Malpua) त्यांच्यासाठी टेस्टी मालपुआ घरी बनवून ठेवा. मालपुआ एक गोड आणि सुगंधी पदार्थ आहे, जो तुमच्या मुलांना नक्की आवडेल. पाहुया मालपुआ बनवण्याची रेसिपी. (Sweet Dish Malpua)

साहित्य –

गहू आटा/चपाती पीठ – ३ वाट्या

सूजी- १ वाटी

साखर -१ कप

वेलदोडे पावडर – १ छोटा चमचा

दुधावरची साय -१ चमचा

बडिशेप पावडर १ छोटा चमचा

दूध -१ ग्लास

तेल-तळण्यासाठी

तूप – चवीसाठी

कृती-

मालपुआ बनवण्यासाठी एका बाउलमध्ये गहू आटा आणि सूजीचे चांगले मिश्रण करा. त्यामध्ये वेलदोडे पावडर, बडिशेप पावडर, दूध घालून फेटून घ्या.

या मिश्रणात दुधाची साय घालून फेटून घ्या. यामध्ये कोणतीही गाठ राहू नये, याची काळजी घ्या. हे मिश्रण बाजूला ठेवून द्या.

आता साखरेचा पाक बनवण्यासाठी एक भांडे घ्या. एक कप साखर आणि एक कप पाणी घालून उकळा. तार सुटूपर्यंत पाक तयार करा.
यानंतर मालपुआ तयार करायचा आहे. एका नॉन स्टीक पॅनमध्ये तेल गरम करा. तेल चांगले गरम होऊ द्या नाही तर मालपुए तेलात तुटू शकतात.

तेल गरम झाल्यानंतर एक लहान चमच्याचा मदतीने पीठाचे मिश्रण घेऊन गोल गोल पुऱ्याप्रमाणे तेलात सोडा. पुऱ्यांना सोनेरी रंग येऊपर्यंत तळा. मध्यम आचेवर मालपुआ तळा. तळलेला मालपुआ साखरेच्या पाकात मुरत ठेवा. जवळपास ५-७ मिनिटे मालपुआ मुरत ठेवावा. त्यानंतर मालपुआ बाहेर काढून एका ताटात ठेवा. त्यावर ड्रायफ्रुट्स घालून खायला घ्या. तुम्हाला तूप आवडत असेल तर गरम गरम मालपुआवर तुपाची धार सोडून खायला घ्या.

 

Back to top button