Benefits of Apple : रोज एक सफरचंद खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे? | पुढारी

Benefits of Apple : रोज एक सफरचंद खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे?

पुढारी ऑनलाईन डेस्क : रोज एक सफरचंद खावे, असे सांगितले जाते. तुम्हाला माहित आहे का, एक सफरचंद खाल्ल्याने कोणते कोणते फायदे मिळतात. सफरचंद सालीसकट खावे असेही सांगितले जाते. तुम्हाला जेव्हा खावेसे वाटेल, तेव्हादेखील तुम्ही सफरचंद खाऊ (Benefits of Apple) शकता. पण, सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का? सफरचंदमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. शिवाय पुरेशा जीवनसत्वामुळे त्यास जादूचं फळ म्हणतात. सफरचंद खाल्ल्यानंतर पोट भरल्याची जाणीव होते, त्यामुळे अतिरिक्त किंवा वारंवार खाणे टाळले जाते. (Benefits of Apple)

आरोग्यासाठी फायदेशीर सफरचंद खाण्याचे फायदे असे –

सफरचंद हे तुमचे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्याचे काम करते.

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सफरचंद खूप आरोग्यदायी आहे.

ज्यांना दृष्टीने कमी दिसतं किंवा डोळ्यांची समस्या आहे, त्यांनी सफरचंद खावे.

शरीरातील सूज कमी करण्यासाठी सफरचंद उपयोगी आहे.

हृदयासाठी तर सफरचंद उत्तम आहे.

मधुमेही रुग्णदेखील सफरचंद खाऊ शकतात.

तुमचे पोट फुगत असेल अथवा गॅसची समस्या असेल तर सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो.

हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी सफरचंद उत्तम फळ आहे.

सफरचंदाला ऊर्जा देणारं फळ म्हटलं जाते. त्यामुळे सकाळी नाश्ता केला नसल्यास एक सफरचंद जरूर खावे, विशेषत: महिलांसाठी, ज्या नोकरी करतात; त्यांना कष्टामुळे थकवा जाणवत असतो, अशावेळी महिलांनी सफरचंद अवश्य खावे.

 

Back to top button