Ram Charan: अनिल कपूरविषयी राम चरणचा मोठा खुलासा | पुढारी

Ram Charan: अनिल कपूरविषयी राम चरणचा मोठा खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क : राम चरण साऊथ इंडस्ट्रीतील सर्वात उत्तम कलाकारांपैकी एक आहे. मागील वर्षी त्याचा चित्रपट आरआरआरने सिनेमागृहांमध्ये मोठा धुमाकूळ घातला होता. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत (Ram Charan) ज्युनिअर एनटीआरदेखील दिसला होता. चित्रपटातील गाणे नाटू नाटूला बेस्ट ओरिजिनल सॉन्गसाठी ऑस्कर ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आलं होतं. या चित्रपटाने वर्ल्ड वाईड चांगला गल्ला जमवला होता. राम चरणचे अनेक चित्रपट सध्या लाईनमध्ये आहेत, यामध्ये गेम चेंजर आणि आरसी १६ चा देखील समावेश आहे. (Ram Charan)

मगधीराविषयी राम चरणचा मोठा खुलासा

सर्वांना माहितीये की, राम चरणचा चित्रपट मगधीरा चित्रपटगृहामध्ये सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने लोकांना प्रेमात पाडले. या चित्रपटाचे दिग्दर्शन एसएस राजामौली यांनी केलं होतं. पण, खूप कमी लोकांना माहिती असावी की, मगधीरा चित्रपटाच्या रीमेकसोबत राम चरण बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेणार होता. हा ब्लॉकबस्टर चित्रपट २००९ मध्ये रिलीज झाला होता. तमिळ, तेलुगू भाषेतील चित्रपट प्रेक्षकांना भावला होता.

आता मगधीराविषयी राम चरणने खुलासा केला आहे की, बॉलीवूड दिग्दर्शक या चित्रपटाचा हिंदी रीमेक बनवू इच्छितात.

राम चरणने एका मुलाखतीत म्हटलं आहे की, अनिल कपूर यांनी मगधीरा चित्रपटाच्या हिंदी रीमेक विषयी इच्छा व्यक्त केली होती. अनिल कपूरचे भाऊ आणि प्रसिद्ध बॉलीवूड निर्माता बोनी कपूर यांनी प्रोजेक्ट के च्या निर्मितीवरून देखील चर्चा केली होती. पण, राम चरणने हा प्रस्ताव नाकारला होता.

रीमेक बनवण्यास राम चरणने दिला होता नकार

राम चरण म्हणाला, विश्वास बसत नव्हता की, खरचं मगधीराचे वास्तवात रीमेक होऊ शकतं. ज्यावेळी मी अनिल कपूर यांना भेटलो तेव्हा ते मला म्हणाले की, मला आणि बोनीला तुझ्यासोबत मगधीराचा हिंदी रीमेक बनवायचा आगहे. पण, मी म्हणालो की, मी रीमेक करू शकेन की नाही, हे मला माहिती नाही. मगधीरा एक प्रेमळ चित्रपट आहे, जो पुन्हा नाही बनवू शकत.

हेदेखील वाचा-

Back to top button