

पुढारी ऑनलाईन डेस्क : उर्फी जावेद बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री आहे. ती आपल्या स्टायलिश अंदाजासाठी ओळखली जाते. नेहमी आपल्या अतरंगी फॅशनमुळे ती चर्चेत राहते. आतादेखील ती एका ट्विटमुळे चर्चेत आलीय. या ट्विटला हजारो लाईक्स आले आहेत. उर्फीने एक ट्विट केलं आहे, जे खूप व्हायरल होत आहे.
या ट्विटमध्ये तिने म्हटलंय-'नंगे तो सभी है भाई… बस फर्क इतना है मैं कपडों से, कुछ लोग सोच से.' उर्फीच्या या ट्विटरवर हजारों लाईक्स आले आहेत. पण, उर्फीने हे ट्विट कुणासाठी आणि का केलं आहे, याविषयी माहिती मिळत नाही.
उर्फी जावेद वेगवेगळ्या अंदाजात वेगवेगळ्या कपड्यांमध्ये दिसते. तिचे कधी कौतुक होते तर कधी खूप ट्रोल केलं जातं. उर्फीच्या फॅशन सेन्सचे कौतुक खुद्द रणवीर सिंहने केले होते. उर्फी सोशल मीडिय़ा सेन्सेशन बनलीय. तिचे व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.