Tips to Empower Child : मुलांना सक्षम करायच आहे? पालकांनी ‘या’ चुका टाळायलाच हव्यात!

Tips to Empower Child : मुलांना सक्षम करायच आहे? पालकांनी ‘या’ चुका टाळायलाच हव्यात!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुलांना सक्षम, संस्कारी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची असते. काहीवेळा व्यवहारीरित्या मुलांच्यात आत्मविश्वासाची कमी जाणवते. बहुतांश पालक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या मुलांशी वागतात आणि व्यवहार करतात, त्याचा प्रभाव मुलांच्या जडणघडणीवर (Tips to Empower Child) होतो. विविध प्रकारच्या पालकत्वामुळे काही मुले व्यवहारीकरित्या अधिक आत्मविश्वासू बनतात, तर काहीजण कमी आत्मविश्वासू नेभळट बनतात. जाणून घेऊया मुलांना सक्षम करण्‍यासाठी पालकांनी  कोणत्या चुका टाळणे आवश्‍यक आहे याविषयी…

Tips to Empower Child : गरजेपेक्षा अधिक सक्ती

मुलांना संस्कारी बनवण्यासाठी कित्येकवेळा एखाद्या गोष्टीची सक्ती करणे आवश्यक असते; परंतु अधिक सक्ती केल्याने तुमच्या मुलांच्या मनात भीती निर्माण होवू शकते. पालकांनी मुलांवर संस्कार करताना किंवा एखादी चांगली सवय लावताना सक्‍ती होणार नाही याची  काळजी घेतली पाहिजे. असे झाल्यास तुमचे मुल तुमच्यासोबत कोणतीही गोष्ट शेअर करु शकते. पालकांनी मुलांना वेळ देऊन त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर इतर मुलांसारखे तुमचे मुल मोकळीक (Tips to Empower Child) फिल करू शकणार नाही.

मुलांना मारहाण करणे

मुलांच्या हातून कळत नकळत चुका होत असतात. त्याच्या चुकांवर पालकांनी मुलांना मारहाण करणे टाळले पाहिजे. मुलांना मारणे हे कोणत्याही समस्येवरील योग्य उपाय होऊ शकत नाही. मुले चुकत असतील किंवा अधिक त्रास देत असतील, तर त्यांना ते करत असलेली गोष्ट कशी आणि का चुकीची आहे, हे प्रेमाने समजून सांगावे. मुलांना वारंवार मारहाण केल्याने त्याच्यातील आत्मविश्वास कमी होतो. ते करत असलेली प्रत्येक गोष्ट त्यांना चुकीची वाटू लागते, यामुळे तुमचे मुल सक्षम(Tips to Empower Child)  होण्याच्या दृष्टीने कमी पडू लागते.

दुसऱ्या मुलांशी तुलना करणे

छोट्या मुलांची कायम ही तक्रार असते की, त्यांचे आई वडील त्यांची तुलना इतर त्यांच्या मित्रांशी करतात. त्यांना त्यांच्या मित्रांसमोर कमी लेखतात. अशी चुक तुम्ही देखील करत असाल तर, तुमच्या मुलांच्या मनात तिचे मित्र आणि इतर सहकार्यांविषयी इर्षा, द्वेष आणि हिंसा निर्माण होऊ शकते. पालकांच्या अशा वर्तनामुळे मुले आपली कल्पनाशक्ती हरवून बसतात आणि जीवनात कधीच पुढे जाऊ शकत नाहीत.

प्रेरणा न देणे

आजकालचे पालक मुलांना सक्षम बनवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींवर ओरडतात.  मुलांना प्रेरणा देत नाहीत. पालकांनी मुलाच्या एखाद्या कृतीवर किंवा यश मिळवल्यावर त्याचे कौतुक करणे आणि प्रेरित करणे आवश्यक आहे. असे न केल्यास मुलांची मानसिकता नकारात्‍मक होवू शकते. कित्येकवेळा मुल शाळेत किंवा इतर कोणत्याही ठिकाणी चांगली कामगिरी करू शकत नाहीत. मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि तो टिकवून ठेवण्यासाठी पालकांनी मुलांना प्रेरित करणे आवश्यक आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news