खराडीत रंगणार उद्या जंगी कुस्त्यांचा आखाडा

खराडीत रंगणार उद्या जंगी कुस्त्यांचा आखाडा

येरवडा; पुढारी वृत्तसेवा : खराडी येथील श्री काळभैरवनाथ देवाच्या उत्सवानिमित्त बुधवारी (दि. 15) दुपारी 12 वाजता कुस्त्यांचा आखाडा आयोजित केला आहे. कै. राजाराम भिकू पठारे पाटील विद्यालयाच्या प्रांगणामध्ये कै. विठोबा मारुती पठारे इनडोअर स्टेडियममध्ये हा आखाडा होणार असून, यात देशपातळीवरील नामांकित मल्ल सहभागी होतील. ग्रामस्थांच्या वतीने एकूण 28 लाख रुपयांची रोख बक्षिसे विजेत्यांना देण्यात येणार असल्याची माहिती आखाडाप्रमुख माजी नगरसेवक महादेव पठारे पाटील यांनी दिली.

प्रथम क्रमांकाची कुस्ती महान भारत केसरी पै. सिकंदर शेख विरुद्ध भारत केसरी पै. बिनिया (जम्मू ) यांच्यात होईल. द्वितीय क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध महाराष्ट्र केसरी पै. हर्षद सदगीर, तृतीय क्रमांक कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी पै. महेंद्र गायकवाड विरुद्ध भारत केसरी पै. विशाल, चतुर्थ क्रमांकाची कुस्ती उत्तर प्रदेश केसरी आर्यन प्रताप विरुद्ध नॅशनल चॅम्पियन पै. माऊली कोकाटे आणि पाचव्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी बाला रफिक विरुद्ध राष्ट्रीय विजेता पै. सागर बिराजदार यांच्यात होणार आहे. याशिवाय पृथ्वीराज मोहोळ, तुषार डुबे, शुभम शिदनाळे आदी नामांकित मल्लांच्या सुमारे 70 कुस्त्या होणार आहेत.

कुस्ती आखाड्याचे कामकाज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अण्णासाहेब पठारे व माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली होईल. बबन पठारे पाटील, कुस्ती प्रशिक्षक विलास कंडरे, ट्रस्टचे अध्यक्ष राहुल पठारे, माजी नगरसेवक महेंद्र पठारे, युवा नेते सुरेेंद्र पठारे, बाळासाहेब राजगुरू, गुलाब पठारे, नवनाथ पठारे, बापू पठारे, दिलीप पाटील यांसह भैरवनाथ चॅरिटेबल ट्रस्ट व हनुमान चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यकारी मंडळाने या स्पर्धेचे नियोजन केले आहे. कुस्ती शौकिनांनी या वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news