Gardening: बागकामामुळे मानसिक आरोग्याचा धोका होतो कमी: नवीन संशोधनातील माहिती | पुढारी

Gardening: बागकामामुळे मानसिक आरोग्याचा धोका होतो कमी: नवीन संशोधनातील माहिती

पुढारी ऑनलाईन: कोलोरॅडो विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनातून शारीरिक आणि मानसिक आरोग्यासंदर्भात एक नवीन गोष्ट समोर आली आहे. या संशोधनातून नियमित बागकाम (Gardening) करणारे लोक हे अधिक ॲक्टिव्ह असलेले दिसले. ज्यांच्यामध्ये तणाव आणि चिंता कमी असल्याचे जाणवले. जीवनशैलीतील अनेक सवयी या विविध असंसर्गजन्य आणि जुनाट रोगांना कारणीभूत असतात. अलीकडील एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, निसर्गाशी एकरूप असलेल्या वृद्धांमध्ये कर्करोग, मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचा धोका कमी असतो.

कोलोरॅडो विद्यापीठातील संशोधकांचा हा अभ्यास लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. बागकाम हा एकमेव उपाय आहे की, जो एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण आरोग्यावर प्रभाव टाकतो. या संशोधनाला अर्थसहाय्य करणाऱ्या अमेरिकन कॅन्सर सोसायटीने म्हटले आहे की, या संशोधनातून सामुदायिक बागकाम (Gardening) हे व्यक्तीचे जुने आजार आणि मानसिक आरोग्याचे विकार रोखण्यास महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे म्हटले आहे.

कोलोरॅडो विद्यापीठातील पर्यावरण अभ्यास विभागातील प्राध्यापक जिल लीट यांनी म्हटले आहे की, या संशोधनातील निष्कर्ष हे ठोस पुरावे देतात की, सामुदायिक बागकाम (Gardening) हे कर्करोग, जुनाट आजार आणि मानसिक आरोग्य विकार बरे करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.

या संशोधनात संशोधनकर्त्यांनी शहरी भागातील सामुहिक पद्धतीने बागकाम (Gardening) करणाऱ्यांचा अभ्यास करण्‍यात आला.  यामध्ये अमेरिकेतील डेन्व्हर आणि अरोरा शहरातील ३७ सामुदायिक बागांचा समावेश होता. एकूण २९१ लोकांनी सहभाग घेतला होता, ज्यांचे दोन भागात विभागीकरण करण्यात आले होते. यामधील एका गटाला एका गटाला बागेचा प्लॉट, बियाणे, रोपे आणि बागकामाचा परिचय करून बागकामासाठी नेमण्यात आले. तर दुसऱ्या एका गटाला काहीच देण्यात आले नाही.

अभ्यासादरम्यान संशोधनातून स्पष्टपणे आढळून आले की, बागकाम करणारे लोक अधिक फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करतात, त्यामुळे इतरांच्या तुलनेत ते आहारात १.४ ग्रॅम इतके अधिकचे फायबर घेतात. तसेच त्यांची शारिरीक हालचालही अधिक होते, त्यामुळे ते इतरांपेक्षा अधिक सक्रिय आणि निरोगी असतात.

हेही वाचा:

Back to top button