मृत्‍यूपूर्वी मानवी मेंदूत कोणते विचार येतात? संशोधकांनी मांडले ‘हे’ निष्‍कर्ष…. (Brain Moments Before Death)

मृत्‍यूपूर्वी मानवी मेंदूत कोणते विचार येतात? संशोधकांनी मांडले ‘हे’ निष्‍कर्ष…. (Brain Moments Before Death)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मृत्‍यू हा शब्‍द उच्‍चारला तरी अनेकांच्‍या मनात भीतीने थरकाप उडतो. सारं काही संपणार, या भावनेतून भय निर्माण होते. मृत्‍यूबाबत आदिम काळापासूनच मानवाला कुतूहल राहिले आहे. आधुनिक वैद्यकीय शास्‍त्रामध्‍येही व्‍यापक संशोधनही झाले आहे. मृत्‍यूपूर्वी मानवी मेंदूत नेमके कोणते विचार येत असतील?, या कुतूहल वाढविणार्‍या प्रश्‍नावर मागील काही वर्ष सातत्‍याने संशोधन होत आहे. ( Brain Moments Before Death ) जाणून घेवूया, मानवी कुतूहल वाढविणार्‍या या प्रश्‍नावर झालेल्‍या संशोधनाविषयी….

Brain Moments Before Death : असे झालं संशोधन…

८७ वर्षीय वृद्ध व्यक्तीच्‍या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला होता. डॉक्टरांनी ऑपरेशन करून रक्ताची गुठळी काढून टाकण्याचा निर्णय घेतला. त्‍यांच्‍यावर यशस्‍वी शस्‍त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर तिसर्‍या दिवसानंतर त्‍यांना पुन्हा त्रास होवू लागले. त्‍यामुळे मेंदूचे स्‍कॅन करण्‍यासाठी त्‍यांनी हॉस्‍पिटलमध्‍ये नेण्‍यात आले. मेंदूचे स्‍कॅनिंग सुरु असतानाच त्‍यांना ह्‍दयविकाराचा तीव्र झटका आला. याचवेळी मेंदूचे स्‍कॅनही सुरु होते. त्‍यामुळे मृत्‍यूपूर्वी मेंदूतील लहरींमध्‍ये झालेल्‍या बदलावर संशोधकांनी अध्‍ययन करत आपले काही निष्‍कर्ष नोंदवले, अशी माहिती लुईसविले विद्यापीठातील न्यूरोसर्जन डॉ. अजमल झेम्‍मर यांनी दिली.

मेंदूचे स्‍कॅनिंग सुरु असताना रुग्‍णाचा मृत्‍यू

या संशोधनाबाबत बोलताना डॉ. झेम्‍मर म्‍हणाले की, मृत्‍यूपूर्वी मेंदूचे स्‍कॅन करण्‍याविषयी आम्‍ही नियोजन केले नव्‍हते. स्‍कॅन सुरु असताना रुग्‍णाला त्रास सुरु झाला. त्‍यांना फिट आली. यानंतरही ईईजीला ते प्रतिसाद देत होते. याचेळी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. यावेळी त्‍यांच्‍या मेंदूतचे स्‍कॅनिंग झाले. त्‍यामुळे आम्‍हाला मृत्‍यूपूर्वीमध्‍ये मेंदूमध्‍ये निर्माण होणार्‍या  दुर्मिळ डेटा मिळाला,"

जुन्‍या आठवणींचे होते स्‍मरण…

हृदयविकाराचा अनुभव घेणाऱ्या रुग्णांच्‍या मेंदूमध्‍ये बदललेल्‍या लहरीचा शोध घेण्‍याचा हा पहिला शोध ठरला. संशोधकांनी निष्‍कर्ष काढला आहे की, मृत्‍यूपूर्वी तुमच्या आयुष्यातील सर्वोच्च आठवणी काय आहेत? उदा. तुमची पहिली नोकरी, तुमचे लग्न किंवा मुलाचा किंवा मुलीचा जन्म. अशा आठवणी शेवटच्या क्षणांमध्ये आठवण्‍याची शक्‍यता अधिक असते.

मेंदूचे स्‍कॅन करत असताना ८७ वर्षीय रुग्‍णाला हृदयविकाराचा तीव्र जटका आला. यावेळी ९०० सेंकद मेंदूमध्‍ये झालेल्‍या लहरींच्‍या बदलाची नोंद घेण्‍यात आली. यामध्‍ये असे दिसून आले की, माणसाच्‍या हृदयाची धडधड थांबवण्याआधी ३० सेंकद आधी जुन्‍या आठवणी, स्‍वप्‍ने किंवा ध्‍यान करताना जसा मेंदूतील लहरी बदलात तसेच बदल मृत्‍यूपूर्वीही मेंदूत दिसून आले. यामध्‍ये जुन्‍या आठवणींचे प्रमाण अधिक असल्‍याचेही निदर्शनास आल्‍याचे डॉ. झेम्‍मर यांनी नमूद केले.

रुग्णाच्या हृदयाची धडधड थांबल्यानंतर 30 सेकंदांपर्यंत मेंदूमध्‍ये लहरी सुरुच होत्‍या. यामुळे संशोधकांनी निष्‍कर्ष काढला आहे की, मृत्‍यूपूर्वी मानवी मेंदूत साठवलेल्‍या स्मृतींचे स्‍मरण येवू शकते. अमेरिकेतील संशोधकांनी २०१३ मध्‍येही उंदारांवर केलेल्‍या संशोधनातही असेच निष्‍कर्ष काढले होते. संशोधकांनी नऊ उंदरांच्या मेंदूमध्ये त्यांच्या मेंदूची क्रिया मोजण्यासाठी सहा इलेक्ट्रोडचे रोपण केले. काही वेळातच प्राण्यांना प्राणघातक इंजेक्शन देण्यात आले. त्यांच्या निष्कर्षांमध्ये सर्वच उदरांच्‍या मेंदूतील लहरीत समान बदल दिसून आला होता.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news