mental health : हृदयरोग आणि मानसिक आरोग्य | पुढारी

mental health : हृदयरोग आणि मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य (mental health) हे एखाद्या व्यक्तीच्या भावनिक, मनोवैज्ञानिक आणि सामाजिक आरोग्याशी संबंधित असते. आपल्या मनाची स्थिती कशी आहे हे आपण कसे वागतो, विचार करतो आणि निर्णय घेतो यावर परिणाम करते. अल्प-किंवा दीर्घकालीन मानसिक आरोग्य आजार असलेल्या व्यक्तीची मनःस्थिती, वागणूक, विचार आदींवर परिणाम करू शकते. शरीरावर, विशेषतः हृदयावर आघात, नैराश्य, चिंता आणि तणाव यांचे नकारात्मक परिणाम विविध संशोधन अभ्यासांद्वारे सिद्ध झाले आहेत. (mental health)

दीर्घकालीन ताण : ही एक अस्वस्थ भावनिक तणावाची स्थिती आहे; जी दीर्घकाळ टिकते आणि अंदाजे बायोकेमिकल, शारीरिक आणि वर्तणुकीतील बदलांसह दिसून येते. तणाव हे शरीरातील रक्तवाहिन्यांना हानिकारक संप्रेरक वाढवते. जेव्हा एखादी व्यक्ती दीर्घकालीन तणावातून जात असेल, जसे कामाचा ताण, कौटुंबिक समस्या, कुटुंबातील दीर्घकालीन आजार किंवा स्वतःचे आजारपण ही यामागची कारणे आहेत. वर्षांनुवर्षे हे सर्व ताण शरीरात अनेक बदल घडवून आणतात, ज्यामुळे मधुमेह, रक्तदाब आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग होऊ शकतात. त्यात 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. (mental health)

कौटुंबिक संघर्ष किंवा कामाच्या तणावामुळे क्रोध आणि शारीरिक ताण येऊ शकतो. या परिस्थितींमध्ये कोरोनरी हृदयरोग आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. यावर उपाय म्हणून एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराची घटना घडण्याची शक्यता उपचाराने कमी करता येते. मानसिक आरोग्य समस्यांचे लवकर निराकरण करून त्यांना निरोगी सवयी लावून जसे की शारीरिक सक्रियता, पोषक आहार आणि धूम—पान टाळणे यातून योग्य लाभ मिळू शकतात. यासाठी योग, खेळ, व्यायाम, ध्यान किंवा संगीताने तणावावर नियंत्रण ठेवावे. आधुनिक वैद्यकशास्त्रात मानसिक तणाव आणि हृदयविकारापासून मुक्त राहण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

डॉ. बिपीनचंद्र भामरे 

Back to top button