Best Teas to keep you warm | कुठे गुलाबी तर कुठे बटर चहा.., हिवाळा उबदार बनवण्यासाठी चहाचे ‘हे’ ८ प्रकार नक्कीच ट्राय करा! | पुढारी

Best Teas to keep you warm | कुठे गुलाबी तर कुठे बटर चहा.., हिवाळा उबदार बनवण्यासाठी चहाचे 'हे' ८ प्रकार नक्कीच ट्राय करा!

पुढारी ऑनलाईन डेस्क : उशीरा का होईना पण पावसाने माघार घेतली आणि थंडीची दुलई आता सगळीकडे पसरू लागली आहे. थंडीमध्ये गरम कपड्यांसोबतच आठवण येते ती चहाच्या वाफळत्या कपाची. तसं पाहता भारतासारख्या चहाप्रिय देशाचं चहापरेम वेगळं सांगायची गरज नाही. भारतीयांच्या चहा प्रेमाने त्याला राष्ट्रीय पेयाचा दर्जाही दिला आहे. विविधतेत एकता असलेल्या या देशात चहा या टायटलखाली अनेक वेगवेगळ्या पद्धतीचा चहा भारतीयांच्या घरात दिसतो. तुम्हीही या हिवाळ्यात चहाचे हे प्रकार जरूर ट्राय करा. (Best Teas to keep you warm)

मसाला चहा : चहाचा सगळ्या सोपा आणि बऱ्याच ठिकाणी केला जाणारा प्रकार म्हणजे मसाला चहा. घरातील मसाल्याच्या डब्यातील मसाले जस की दालचीनी, वेलची, लवंग, आलं, गवती चहा असे मसाले घालून केला जातो. काहीसा कडक, उत्साह वर्ध्यक आणि शरीरात उष्णता वाढवणारा आहे.

तंदुरी चहा : हा चहा नेहमीच्या पद्धतीनेच बनवला जातो पण सर्व्ह करताना मात्र मातीच्या कुल्हडमध्ये सर्व्ह केला जातो. या चहामध्ये कुल्हडचा स्मोकी आणि खास अशी टेस्ट उतरते. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं ट्राय करायचं असल्यास हा चहा ट्राय करू शकता.

गुलाबी चहा : होय अगदी बरोबर वाचलं ! साधारण चहाचा रंग केशरी ते सोनेरी या शेडसमध्ये असतो. पण चहाचा काहीसा हटके प्रकार म्हणजे गुलाबी चहा. काश्मिरी चहा अशीही या चहाची ओळख आहे. पण हा चहा चवीला गोड नाही तर वेगळा लागतो यांच कारण म्हणजे त्यात मीठही घालतात. चहाची पत्ती, बेकिंग सोडा, वेलची, दूध आणि सगळ्यात शेवटी अगदी थोडं मीठ टाका. गुलाबी थंडीसाठी तुमचा गुलाबी चहा तयार!

हिबिस्कस चहा : जास्वंदच फूल केवळ देवांसाठीच नाही तर चहा बनवण्यासाठीही वापरलं जातं. साखर, दालचीनी, आलं पानी आणि जास्वंद फूल हे सगळं एकत्र उकळून हा चहा बनवला जातो. चवीत बदल हवा असेल तर हा चहा जरूर बनवा. यासाठी ताजी फुलं किंवा हिबिस्कस टी बॅगही वापरू शकता.

बटर चहा : बटर प्रेमी लोकांसाठी हा चहा खास असेल यात शंका नाही. तिबेटकडील लोकांमध्ये हा चहा लोकप्रिय आहे. पाणी, मीठ, चहा पत्ती आणि बटरचा समावेश असतो. हिमालयीन लोक शक्यतो अनेकदा याकच्या दुधाचं बटर वापरलं जातं.

काश्मिरी कहावा : एनर्जी आणि आरोग्य देणारा चहा म्हणजे काश्मिरी कहावा. बदाम, गुलाबाच्या पाकळ्या, आल, दालचिनी, वेलची, लवंग हे घालून हा चहा केला जातो. सर्दी किंवा कफ झाला असेल तर हा चहा बनवतात. अर्थातच या चहात केसर घालण्याच अजिबात विसरू नका. यात दूध घालत नाहीत.

कांगडा चहा : फक्त हिमाचल आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशात मिळणारी ही चहापत्ती आहे. वेगळ्या टेस्टसाठी हिची खास ओळख आहे.

जॅस्मिन टी : चमेली किंवा जॅस्मिनच्या फुलांचा वापर या चहासाठी केला जातो. यात गुलाबाच्या पाकळ्याही घातल्या जातात. या चहा उपयोग इतर चहापेक्षा उलटा म्हणजे रिलॅक्स होण्यासाठी केला जातो. ग्रीन टी, वेलची, जॅस्मिन फूल, गुलाबाच्या पाकळ्या, मध, लिंबाचा रस या सगळ्यांचा समावेश या चहात केला जातो. (Best Teas to keep you warm)

हे ही वाचा :

 

Back to top button