Tips For Parent: पालकांच्या रागाचा मुलांवर होतो गंभीर, दीर्घ परिणाम; पालकांनो असा साधा मुलांशी संवाद | पुढारी

Tips For Parent: पालकांच्या रागाचा मुलांवर होतो गंभीर, दीर्घ परिणाम; पालकांनो असा साधा मुलांशी संवाद

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेवटी मनुष्य प्राणी म्हटल्यावर चुका होणार, चीडचीड होणार, राग हा येणारच. मग ती व्यक्ती लहान असो, मोठी असो अगर वयोवृद्ध. मनाविरोधी कोणतीही कृती झाल्यास, दुसऱ्या व्यक्तीने त्रास दिल्यास राग (Tips For Parent) हा येतोच. राग, क्रोध, प्रेम हे जीवनाचा भागच आहेत ते ठराविक काळापुरतेच राहते आणि पुन्हा कमी जास्त होते.

रागाचा प्रभाव जरी दिर्घकाळ राहत नसला तरी, रागाच्या (Tips For Parent)  भरात हातून भयंकर चुका होऊ शकतात आणि याच्या परिणामांचे पडसाद आयुष्यभर उमटत राहतात. म्हणून आपण मुलांवर सतत रागावल्याने काय परिणाम होतात; हे पालकांनी समजून घेणे गरजेचे आहे. जे तुम्हाला तुमच्या मुलांच्या जडणघडणीत मदत करू शकतात.

काही पालक हे त्यांच्या मनात सुरू असलेला विचार, ऑफिसमधील सहकार्यांशी झालेले मतभेद आणि कामाचा ताण कॅरी करतात. घरी आल्यावर मुले जर मनाविरूद्ध वागली किंवा त्यांचे ऐकले नाही, तर पालक मुलांवर आपल्या राग काढतात. पण पालकांना हे कळत नाही की, याचा मुलांवर दीर्घकालीन हानिकारक परिणाम होऊ शकतात. पालकांकडून नेहमी रागराग (Tips For Parent) व्यक्त केल्यास, कुटुंबात तणावाचे वातावरण राहते. याचा परिणाम मुलांची कार्यक्षमता, त्यांच्या भावनिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

Tips For Parent : पालकांच्या रागाचा मुलांवर होतात ‘हे’ परिणाम

  • पालकांच्या ओरडून रागवण्याचा मुलांवर परिणाम होणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे.
  • पालकांच्या रागवण्याने मुले स्वत:ला दोषी ठरवतात. या विचारामुळे मुलांवर ताण निर्माण होतो. याचा परिणाम मुलांच्या मेंदू विकासावर होतो. त्यामुळे मुलांना भविष्यात मानसिक आजारांचा देखील सामना करावा लागू शकतो.
  • पालकांनी सातत्याने आपल्या मुलांवर राग व्यक्त केल्याने त्यांच्या मनात आपराधीपणाची भावना निर्माण होऊ शकते.
  • पालक सतत रागवत असल्याने मुले अबोल बनतात. कोणाशीही मनमोकळेपणाने बोलत नाहीत. याचा परिणाम त्यांच्या भावनेवर होतो.
  • पालकांच्या भितीने मुळे आपल्या भावना व्यक्त करत नाहीत. मनात दाबून ठेवतात, यामुळे त्यांना मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो.
  • राग न आणावर झाल्याने अनेक पालक आपल्या मुलांवर ओरडतात किंवा मारहाण करतात. असे केल्याने मुलांना घरात शांत आणि सुरक्षित वाटत नाही.
  • एका संशोधनात म्हटले आहे की, बालपणात जर मुलांना शाब्दिक आणि शारीरिक ताणतणावाचा सामना करायला लागला तर, प्रौढवयात त्याला डोकेदुखी, संधिवाकत आणि तीव्र वेदनेचा सामना करावा लागू शकतो.
  • २०१७ मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात म्हटले आहे की, ५० वर्षे आणि त्याहीपेक्षा अधिक वयोवृद्धांशी संवाद साधला असता, त्यांच्या आत्ताच्या परिस्थितीचे मुळे ही बालवयातील मानसिक आरोग्याशी संबंधित असल्याची दिसून आली.

पालकांनो मुलांशी असा साधा संवाद

  • घरात येताच मनातले विचार, ऑफिसचे काम, जीवनातील ताणतणाव या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मुलांसोबत फ्रेश मुडने संवाद साधा.
  • पालकांनी मुलांसोबत संवाद साधताना आपला राग, चिडचिड, विचार बाजूला ठेवणे आवश्यक आहे.
  • मुले चुकल्यानंतर, त्यावर त्यांच्याशी संवाद साधा, त्यांना समजून घ्या.
  • संवाद साधताना त्यांच्या वयाच्या पातळीला जा. आणि त्यांच्यासारखाच संवाद साधा, म्हणजे ते लवकर संवादी बनतील.
  • पालकांचा आणि मुलांचे नाते संवादी झाल्यास मुलांच्या सर्वागीण जडणघडणीवरदेखील याचा सकारात्मक परिणाम होईल.

हेही वाचा

Back to top button